आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद दंगल: पाच मुस्लिम आमदारांचा मंत्रालयाच्या दारी ठिय्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - औरंगाबाद दंगलीतील संशयितांचे व्हिडिओ फुटेज पुराव्यादाखल देण्यासाठी राज्यातील पाच मुस्लिम आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी भेट मागितली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ देण्यास नकार दिला. त्यामुळे या आमदारांनी मंत्रालयाच्या प्रवेशदारी ठिय्या आंदोलन केले. 


यात काँग्रेसचे आमदार आसिफ शेख, अब्दुल सत्तार, समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि वारीस पठाण यांचा समावेश होता. दंगलीचे व्हायरल झालेले फुटेज घेऊन हल्लेखोरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी या आमदारांनी वर्षा निवासस्थानी जाऊन भेटीची आजची वेळ मागितली होती. आंदोलनाची माहिती मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाला समजली, त्यानंतर या आमदारांना मुख्यमंत्री महोदयांनी रात्री नऊची भेटीची वेळ दिली असल्याचा निरोप सीएमओ कार्यालयातून देण्यात आला. त्यानंतर या आमदारांनी आपले ठिय्या आंदोलन स्थगित केले.

 

बातम्या आणखी आहेत...