आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - दुचाकीवर मागे बसणाऱ्या प्रवाशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपकरणे बसवण्याचे अादेश सर्वोच्च न्यायालयाने दिले हाेते. त्याची अंमलबजावणी अद्याप का हाेत नाही, अशी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने बजाज ऑटो कंपनी आणि राज्य सरकारला नाेटीस बजावली अाहे. तसेच वाहतूक आयुक्तांना यासंबंधी अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दुचाकीच्या मागच्या भागात साडी गार्ड, पॅडल, चालक बसण्याच्या दोन्ही बाजूला हँडग्रीपसारखी उपकरणे लावण्याच्या सूचना दुचाकी उत्पादक कंपन्यांना द्याव्यात, अशी विनंती मुंबईतील ज्येष्ठ नागरिक ज्ञानप्रकाश यांनी याचिकेद्वारे न्यायालयात केली होती. केंद्रीय वाहन अधिनियम १९८९ नुसार, दुचाकीवरील मागच्या प्रवाशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपकरणे लावणे बंधनकारक आहेत. अशी तरतूद नसलेल्या वाहनांना रस्त्यावर उतरण्याची परवानगीच दिली जाऊ नये, असेही अधिनियमात नमूद आहे.
दरम्यान, दुचाकी उत्पादक बजाज ऑटो कंपनीने स्कूटर किंवा अन्य दुचाकी अशा सुरक्षात्मक उपकरणाशिवाय बाजारात आणू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिवाय, बजाज कंपनी आणि राज्य सरकारने दोन आठवड्यांच्या आत याप्रकरणी उत्तर देण्यासही सांगितले आहे. ज्ञानप्रकाश यांनी याचप्रकरणी २००८ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयात आधीपासूनच अशाच एका याचिकेवर सुनावणी सुरू असल्याने न्यायालयाने त्यांची याचिका रद्द केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.