आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- इस्त्रायली पंतप्रधान बेंझामिन नेतन्याहू यांनी आज दुपारी मुंबईतील 26/11 हल्लातील शहीद आणि मृत्यूमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दक्षिण मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेलमधील स्मृतीस्थळावर कडक सुरक्षेव्यवस्थेत नेतन्याहू यांनी या हल्ल्यात बळी गेलेल्या 166 जणांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी तेथील व्हिजिटर बुकलेटमध्ये त्यांनी खास संदेश लिहला. यानंतर त्यांनी नरिमन पाईंट येथील छबाड हाऊसला भेट दिली.
छबाड हाऊस येथे त्यांनी 11 वर्षाच्या इस्त्रायली मुलगा मोशे हॉजबर्ग याची भेट घेतली. यावेळी मोशेचे आजोबा व त्याचा संभाळ करणारी भारतीय आई उपस्थित होती. मोशेचे पिता रबी गेवरिल हॉजबर्ग आणि आई रिवका नरीमन हाऊसरध्ये 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ल्यात मारले गेले होते. छबाड हाऊसला नेतन्याहू भेट देणार असल्याने मोशे मंगळवारीच मुंबईत दाखल झाला आहे. जेथे त्याने आपले आई-वडिल गमावले व अनाथ झाला त्याच छबाड हाऊसला मोसे यांच्यासह नेतन्याहू यांनी भेट दिली.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, छबााड हाऊस भेटीदरम्यानचे फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.