आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक समुद्र दिवस: पाहा डोळ्यात साठवावे असे कोकणातील एकाहून एक समुद्रकिनारे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंधुदुर्ग - आज जागतिक समुद्र दिवस आहे. महाराष्ट्राला समुद्राचा मोठा समुद्र किनारा लाभला आहे. गोव्यापेक्षाही एकाहून एक सुंदर बीच लाभलेल्‍या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. हौशी पर्यटक ऋतू कोणताही असो कोकणात दरवर्षी कोकणात फिरण्‍याचा आनंद घेत असतात. आज जागतिक समुद्र दिनाच्या निमित्ताने जाणुन घेऊया कोकणातील पाच महत्‍त्वाच्या आणि सुंदर अशा समुद्र किनाऱ्यांविषयी.... 


कोकणात घ्‍या याचा आनंद...
- कोकण पर्यटनात आपल्‍या जगातील सुंदर बीचवर फिरण्‍याचा आनंद मिळतो.
- येथील एकाहून एक सुंदर समुद्रकिनारे डोळ्यात साठवावे वाटतात.
- डॉल्फिनचे दर्शनच्‍या दर्शनासह, विविध वॉटर स्पोर्टस् चा आनंदही येथे लुटला येईल.
- शिवाय हिरव्या माडाच्या बागा, सुंदर खाड्या, जलदुर्गही पर्यटकांसाठी पर्वणी आहेत.
- समुद्रतीरावरील देवालये पाहतानाही मन भारवून जाते.
- कोकणातील खास मालवणी जेवणाची चव चाखल्‍याशिवाय पर्यटक परतत नाहीत.
- सिंधुदुर्गमधील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला हे तीन तालुके समुद्रकिनाऱ्यावर आहेत.
- या तीनही तालुक्यांची स्वतंत्र ओळख आहे. देवगड, वेंगुर्ला हापूस आंब्यांसाठी प्रसिद्ध आहेत.


तारकर्ली- तारकर्ली हे बीच समुद्री पर्यटनात जगात प्रसिद्ध आहे. या संपूर्ण किनाऱ्यावर वीज प्रकाशाची व्यवस्था आहे. पर्यटन विकास महामंडळाने येथे तंबू निवासाचीही व्यवस्था केली आहे. हाऊसबोट व स्पीड बोटीतून येथे समुद्रात सफर करता येते. हा परिसर मालवणपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे.


पुढील स्‍लाइड्सवर पाहा, कोकणातील ही मनमोहक समुद्र किनारे...

 

बातम्या आणखी आहेत...