आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्टरच्या वाढणार अडचणी, फॅशन डिझायनरवर बलात्कार केल्याचे रिपोर्टमधून स्पष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्टर पीयूष सहदेव.... - Divya Marathi
अॅक्टर पीयूष सहदेव....

मुंबई- सोनी टीव्हीवर प्रसारित होत असलेला शो 'बेहद' मध्ये समयची भूमिका साकारणारा अॅक्टर पीयूष सहदेवच्या अडचणी वाढल्या आहेत. एका फॅशन डिझायनर तरूणीने पीयूषवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. आता त्याचा रिपोर्ट आला असून त्यात पीयूषने संबंधित तरूणीवर बलात्कार केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पीयूष या प्रकरणात दोषी आढळू शकतो. पीयूषवर याआधीच आयपीसीच्या 376 नुसार गुन्हा दाखल झाला होता.

 

गेल्या महिन्यात एका 23 वर्षाच्या फॅशन डिझायनर असलेल्या तरूणीने पीयूषवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांना 22 नोव्हेंबर रोजी अटक करावी लागली होती. पीयूष सध्या मुंबईतील आर्थर रोडमधील जेलमध्ये बंद आहे. तसेच कोर्टाने त्याचा जामिन फेटाळून लावला होता.

 

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एका पोलिस अधिका-याने सांगितले की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. तसेच लवकरच याचे चार्जशीट दाखल केले जाईल. पीयूषवर बलात्कार केल्याचा मेडिकल रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे तो यात दोषी आढळू शकतो. पुढील 90 दिवसात त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले जाईल. तोपर्यंत त्याला जेलमध्ये राहावे लागेल.

 

सांगितले जात आहे की, पीयूषने संबंधित फॅशन डिझायनरला लग्नाचे आमिष दाखवले होते. त्यामुळे संबंधित तरूणी त्याच्यासोबत गेल्या तीन महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. याच दरम्यान त्याने तिच्यावर बलात्कार केला. संबंधित तरूणी 'सपने सुहाने लड़कपन' मध्ये काम करत आहे. बेहदच्या आधी पीयूष 'देवो के देव महादेव'मध्ये रामाच्या भूमिकेत दिसला होता.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, अॅक्टर पीयूष सहदेव यांच्यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...