आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळ यांचे फेसबुक लाईव्ह रद्द, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे फेसबुक लाईव्ह रद्द झाल्याची माहिती. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. आणखी दोन दिवस त्यांना वैद्यकिय निरिक्षणाखाली रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त होणार होते. परंतु, भुजबळ यांचे फेसबुक लाईव्हचा रद्द झाले आहे.

 

भुजबळ यांच्या भेटीसाठी समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आज काही कार्यकर्त्यांनी भुजबळ यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. आणि बालाजीची शाल, नाशिकच्या बुधा हलवाईचे पेढे, मोठा हार घालून त्यांचा देखील सत्कार केला.

 

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी नेते आणि कार्यकर्ते उत्सुक आहेत. स्वादुपिंडाचा आणि मधुमेहाच्या त्रासामुळे त्यांच्यावर मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भुजबळ यांच्या जामिनाचे कागदपत्रे घेऊन पोलीस रूग्णालयात आले होते, तिथेच भुजबळ यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. बेहिशोबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी छगन भुजबळ दोन वर्षांपासून अटकेत होते.

बातम्या आणखी आहेत...