आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2017 मध्ये मुंबई ठरले दुर्घटनांचे शहर, या 7 घटनांत गेले शेकडो नागरिकांचे बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एलफिन्स्टन रेल्वे चेंगराचेंगरी दुर्घटना या वर्षातील मुंबईतील सर्वात भयंकर दुर्घटना होती. - Divya Marathi
एलफिन्स्टन रेल्वे चेंगराचेंगरी दुर्घटना या वर्षातील मुंबईतील सर्वात भयंकर दुर्घटना होती.

मुंबई- वर्ष 2017 संपण्यास केवळ दोन दिवस बाकी आहेत. मात्र, हे वर्ष संपता संपता मुंबईत आणखी दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबईतील लोअर परेल भागातील कमला मिल्स कम्पाउंडमधील एका रेस्टांरंटला गुरूवारी मध्यरात्री झालेल्या आगीत तब्बल 14 जणांना आपला जीव गमवावा लागला. यात 11 महिलासह 3 तरूणांचा समावेश आहे. हे वर्ष मुंबईतील घडलेल्या दुर्घटनांसाठी ओळखले जाईल. 2017 मध्ये मुंबईत सात मोठ्या घटना घडल्या आहेत. वर्षभरात घडलेल्या या मोठ्या दुर्घटनांत आतापर्यंत 130 हून अधिक निरपराध नागरिक मारले गेले आहेत. चला जाणून घ्या, कधी आणि काय घटना घडल्या या....

 

#1. 26 जुलै, 2017

 

घाटकोपर या उपनगरातील एक जुनाट चार मजली इमारती कोसळून 17 लोकांचा मृत्यू झाला होता.

 

#2. 5 ऑगस्ट, 2017

 

मुंबईतील दादर चौपाटीवर 3 शालेय विद्यार्थी समुद्रात बुडाले. या तीन मुलांचे वय 13 ते 17 वर्षादरम्यान होती.

 

#3. 25 ऑगस्ट, 2017

 

अंधेरी-सीएसटी हार्बर लोकल ट्रेनचे 4 डब्बे रूळावरून घसरले. यात पाच लोक गंभीर जखमी झाले होते.

 

#4. 31 ऑगस्ट, 2017

 

भेंडी बाजारमध्ये एक 5 मजली इमारत कोसळली. यात 33 लोकांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक नागरिक जखमी झाले होते.

 

#5. 29 सप्टेंबर, 2017

 

एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवरील फुट ओवर ब्रीजवर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 लोकांचा मृत्यू झाला. तर शेकडो लोक जखमी झाले होते.

 

#6. 22 नोव्हेंबर, 2017

 

मुंबई समुद्र किनारी एससीआयचे जहाज समुद्रात बुडाले. मात्र, वेळीच मदत केल्याने सर्व 16 लोकांना वाचविण्यात यश आले. 

 

#7.18 डिसेंबर, 2017

 

अंधेरी ईस्ट भागात एका स्वीट दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 12 कामगारांचा मृत्यू झाला होता.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, यावर्षी मुंबईत झालेल्या दुर्घटनांचे फोटोज ....

बातम्या आणखी आहेत...