आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात सीमेजवळील वृंदावन स्टुडिओत भीषण आग, धार्मिक मालिकांचा सेट जळून खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालघर- महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळच्या उंबरगावमधल्या देहरी येथील वृंदावन स्टुडिओला आज सकाळी भीषण आग लागली आहे. या आगीत सोनी टीव्हीवरील पोरस, महाकाली, शनिदेव या मालिकांचा सेट जळून खाक झाला आहे. यात करोडोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

 

या आगीत जीवितहानी झाली नसली तरी स्टुडिओचं मोठं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्टुडिओमध्ये पीओपी आणि प्लास्टिकचं मोठ काम असल्याने शॉर्ट सर्किटने आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...