आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​गुजरात: भाजपचा पराभव होणार- प्रसिद्ध सेफोलॉजिस्ट योगेंद्र यादवांचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातमध्ये भाजपचा पराभव अटळ असल्याचे योगेंद्र यादवांनी म्हटले आहे. - Divya Marathi
गुजरातमध्ये भाजपचा पराभव अटळ असल्याचे योगेंद्र यादवांनी म्हटले आहे.

मुंबई- गुजरातमध्ये दुस-या आणि अंतिम टप्प्यातील 93 जागांसाठी आज मतदान होत आहे. त्याआधी शनिवारी पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी सरासरी 69 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, गुजरात निवडणूक अंतिम टप्प्यात पोहचली असून, या निवडणुकीत भाजप जिंकणार की काँग्रेस यावर लोक आपापले अंदाज बांधू लागले आहेत. बहुतेक माध्यमे व त्यांच्या वेगवेगळ्या पाहणीतील अंदाजानुसार तेथे भाजप जिंकेल असे सांगत आहेत. मात्र, भाजप व त्यांचे नेते याबाबत फारसे बोलताना दिसत नाहीत.

 

एकीकडे भाजप नेते शांत आहेत तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारीच गुजरातमध्ये काँग्रेस एकतर्फी व मोठा विजय मिळेल असे वक्तव्य केले आहे. दुसरीकडे, देशातील प्रसिद्ध सेफोलॉजिस्ट (निवडणूक विश्लेषक) योगेंद्र यादव यांनीही भाजपचा पराभव अटळ असल्याचा अंदाज बांधला आहे. योगेंद्र यादव यांनी भाजपचा केवळ पराभवच नाही तर दारूण पराभवही होऊ शकतो, असे भाकीत वर्तविले आहे. अर्थात त्याला त्यांनी काही आकडेवारीची जोडही दिली आहे.

 

योगेंद्र यादव यांनी गुजरात निवडणुकीबाबत तीन शक्यता वर्तविल्या आहेत. या तीनही शक्यतानुसार काँग्रेस बाजी मारणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

 

योगेंद्र यादव यांनी वर्तविलेल्या तीन शक्यता खालीलप्रमाणे....

 

शक्यता क्रमांक-1

 

भाजप- 43 टक्के मते- 86 जागा
काँग्रेस- 43 टक्के मते- 92 जागा

 

शक्यता क्रमांक-2

 

भाजप- 41 टक्के मते- 65 जागा
काँग्रेस- 45 टक्के मते- 113 जागा

 

शक्यता क्रमांक-3

 

भाजपचा याहून मोठा व दारूण पराभवाची शक्यता

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, योगेंद्र यादवांनी दिलेली आकडेवारी आणि काय स्थिती आहे गुजरातमधील सामाजिक-राजकीय...

बातम्या आणखी आहेत...