आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवुड स्टार्सला हा पुरवतो ड्रग्ज; मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या, बड्या स्टार्ससोबत रिलेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बकुल चंदेरिया याला अॅंटी नार्कोटिक्स सेलने अटक केली आहे. बॉलिवुड स्टार्सला आफ्रिकन कंट्रीतून ड्रग्जचा पुरवठा करण्‍याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याचे अनेक बड्या स्टार्ससोबत चांगले रिलेशन आहे. बकुल मागील काही वर्षांपासून बॉलिवुडमधील अनेक अॅक्टर आणि अॅक्ट्रेसेसला ड्रग्ज पुरवत होता. सध्या पो‍लिस त्याची कसून चौकशी करत आहेत.

 

बकुल याच्या मोबइलमध्ये अनेक बड्या स्टार्सचे फोन नंबर आढळून आले आहेत. तो स्टार्ससोबत ओळख वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत फोटो क्लिक करत होता. मुंबई पोलिस बकुल याला आज (सोमवार) कोर्टात हजर करणार आहेत.

 

ममता कुलकर्णीसोबत आहेत रिलेशन...
- सूत्रांनुसार बकुल हा नैरोबीहून ड्रग्जचा धंदा चालवत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. नार्कोटिक्स डीलर विक्की गोस्वामी आणि  ममता कुलकर्णीसोबतची त्याचे रिलेशन आहे.
 - बकुल याचे सर्व क्लाइंट्स बॉलिवूडमध्ये आहे. त्याने मुंबईसह बंगळुरुमध्ये आपला धंदा वाढवला आहे. पंचतारांकीत हॉटेलसह डिस्को आणि पबमध्ये कोकीन आणि एलएसडीचा (Lysergic acid diethylamide) पुरवठा करतो.

 

15 लाखाचे ड्रग्ज जप्त...
- नार्कोटिक्स सेलने बकुल याच्याकडून 15 लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत.

- त्याच्याकडे 106 ग्रॅम कोकीन आणि 90 LSD डॉट्स आढळले आहेत.
- पोलिस बकुल याच्या खारमधील फ्लॅटची झाडाझडती घेत आहे. बकुल याच्या खोलीतून पोलिसांना अनेक डायर्‍या सापडल्या आहेत. त्याने अनेक बॉलिवूड स्टार्सचे नाव आणि फोन नंबर नोंदवले आहेत. त्यात पैशांचा हिशेबही लिहिला आहे.

- बकुल याच्या चौकशी काही बड्या स्टार्सचेही नावे समोर आले आहेत. पोलिस या स्टार्सला चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

 

हवालाच्या माध्यमातून 3 कोटींची देवाणघेवाण
- बकुल याने नुकतेच हवालाच्या माध्यमातून सुमारे 3 कोटी रुपयांची देवाणघेवाण केली. त्याने हा व्यवहार साऊथ आफ्रिका आणि नैरोबीहून केला होता.

- इतकेच नाही तर बकुल याने बॉलिवूडच्या एका सिनेमात 5 कोटी रुपये गुंतवले आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... कोण आहे बॉलिवूडमध्ये ड्रग्ज पुरवणारा हा माफिया...
बातम्या आणखी आहेत...