आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वी, 12 वी ‘सायन्स’साठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची; शिक्षण विभागाने घेतला निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ नाशिक - राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गालाच उपस्थित राहतात. तसेच या विद्यार्थ्यांचा खासगी काेचिंग क्लासेसवरच जास्त भर असल्याचे दिसून अाले हाेते. एवढेच नव्हे, तर अनेक खासगी क्लासेस चालकांनी महाविद्यालयांशी ‘करार’ करून विद्यार्थी अापल्याकडे वळवल्याच्या तक्रारी सरकारला प्राप्त झाल्या हाेत्या.

 

त्यामुळे खासगी क्लासेस व महाविद्यालयाची ही ‘दुकानदारी’ बंद करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांतील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची हजेरी आता बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.   

 

अाैरंगाबादचा समावेश

मुंबई, पुणे, नागपूर, अाैरंगाबाद, नाशिक विभागातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांना एका महिन्यात बायाेमेट्रिकची यंत्रणा बसवावी लागेल. जी कनिष्ठ महाविद्यालये बायोमेट्रिक हजेरी सुरू करणार नाहीत, त्यांची मान्यता काढून घेण्यासंदर्भातील कारवाई करण्यात येईल. त्यांचा अहवाल माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक सरकारला देतील.

 

बातम्या आणखी आहेत...