आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीसाठी भाजपकडून यापुढे शिवसेनेशी चर्चा नाहीच; मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अागामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्याबाबत आता शिवसेनेशी कोणतीच चर्चा केली जाणार नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

 
युतीसाठी भाजपकडून अतोनात प्रयत्न करण्यात आले. दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन सर्व निवडणुका लढवाव्यात अशी आमची इच्छा होती. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. चर्चेसाठी निमंत्रणे पाठवली. परंतु, शिवसेनेकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे यापुढे भाजपकडून युतीचा विषय बंद झाला आहे. आता शिवसेनेने पुढाकार घेतल्याशिवाय आम्ही हा विषयसुद्धा काढणार नाही, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. आम्ही हा विषय बंद केला असला तरी आमच्यासोबत लढायचे की आमच्याविरोधात हे शिवसेनेने ठरवावे.

ते ठरवेपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहू.

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत परत येऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रयत्न शिवसेना सोबत येत नसेल तर आम्ही एकट्याने निवडणुका लढवू आणि बहुमतासह सत्तेत येऊ, असा विश्वासही मुनगंटीवारांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...