आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैमानिक आहेत खासदार पूनम महाजन, पित्याच्या आकस्मिक मृत्यूने बदलून गेले LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील भाजपच्या खासदार पूनम महाजन... - Divya Marathi
मुंबईतील भाजपच्या खासदार पूनम महाजन...

मुंबई- दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांची मुलगी आणि मुंबई उत्तर-मध्य भागातील खासदार पूनम महाजन आज (9 डिसेंबर) 37 वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. काही दिवसापूर्वी पंतप्रधान मोदी यांना जूहू एयरपोर्टचे नाव जेआरडी टाटा यांच्या नावावरून ठेवण्याबाबत विनंती करणारी पूनम स्वत: ट्रेंड पायलट आहे. पूनम यांनी पायलटचे ट्रेनिंग अमेरिकेतील टेक्सासमध्ये घेतले आहे. पूनम यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला या युवा राजकीय नेत्याविषयी माहिती देणार आहोत.

 

लायसन्सधारी पायलट आहे पूनम-

 

- 9 डिसेंबर 1980 रोजी प्रमोद महाजन आणि रेखा महाजन यांच्या घरात जन्मलेली पूनम उच्चशिक्षणासाठी अमेरिका आणि लंडनमध्ये झाले आहे.
- तिने ब्रायटन स्कूल ऑफ बिजनेस अॅंड मॅनेजमेंटमधून बीटेकची डिग्री फेब्रुवारी 2012 मध्ये पूर्ण केली. 
- याशिवाय तिने टेक्सास, यूएसमधील एयर मिस्ट्रल फ्लाईंग स्कूलमधून पायलट लायसन्स मिळवले. यासाठी पूनमला 300 तास फ्लाईंग करायला लागले होते.

 

पित्याच्या हत्येनंतर उतरावे लागले राजकारणात-

 

- पूनम यांना खरं तर राजकारणात यायचं नव्हतं. मात्र, 2006 मधील एका घटनेनं त्यांचे कुटुंब उद्धवस्त झाले.
- पिता प्रमोद महाजन यांना सख्ख्या भावाने गोळ्या झाडून मारले. एवढ्या मोठ्या नेत्याचा असा दुर्देवी मृत्यू झाल्याने महाराष्ट्रासह देश हळहळला होता.
- पुढे पूनम यांनी आपल्या पित्याने पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला.
- 2009 मध्ये पूनम घाटकोपर वेस्टमधून विधानसभा निवडणूक लढल्या. मात्र त्यावेळी त्या पराभूत झाल्या.
- 2014 मध्ये भाजपने त्यांना मुंबई नॉर्थ सेंट्रल लोकसभा मतदारसंघातून उतरवले. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त यांना मोठ्या मताधिक्क्याने पराभूत केले होते.

- डिसेंबर 2016 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून त्याची निवड करून पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, पूनम महाजन यांचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...