आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक: नाशकात भाजपचा राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा, पालघरचा वचपा काढणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला डावलून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून शिवाजी सहाणे मैदानात आहेत. दरम्यान, शिवसनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांनी नाशिकमध्ये रविवारी रात्री तळ ठोकत राजकीय हालचालींना वेग दिल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. मात्र, पालघरमध्ये शिवसेनेने भाजपविरोधात उमेदवार दिल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी भाजप नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे शिवाजी सहाणेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागातील मतांची जुळवाजुळव शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केल्याने शिवसेना तेथे चमत्कार करणार का याकडे लक्ष असेल.

 

गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिक निवडणुकीबाबत वेगवेगळे गृहीतके राजकीय व्यासपीठावरून मांडली जात हाेती. या निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या उमेदवाराबराेबर राहताे की अाघाडीच्या उमेदवाराबराेबर की तटस्थ राहताे याबाबत गेल्या पंधरा दिवसांपासून तर्कवितर्क लढविले जात हाेते. पालघर लाेकसभेच्या पाेटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार असतानाही शिवसेनेने अापला उमेदवार उभा केल्याने विधान परिषदेचेही समीकरणे बदलली.

 

मात्र भाजपने अखेरच्या दिवसापर्यंत अापली भूमिका गुलदस्त्यात ठेवत निवडणुकीतील 'सस्पेन्स' कायम ठेवला हाेता. शिवसेनेच्या बड्या नेत्यांबराेबर मुंबईत भाजपच्या वरिष्ठांशी गुफ्तगू झाल्याची चर्चा होती. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. रविवारी रात्री उशिरा विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांनी ज्युपिटर हाॅटेलमध्ये भाजप पदाधिका-यांना निमंत्रित करुन राष्ट्रवादीच्या शिवाजी सहाणे यांना मतदान करण्याचा संदेश दिला. 

 

असे आहे नाशकात पक्षीय बलाबल-

 

- नाशिकमध्ये शिवसेनेची 207 मते आहेत. तर भाजपकडे 167 इतकी निर्णायक मते आहेत.

 

- राष्ट्रवादीकडे 100 तर काँग्रेसकडे 71 मते आहेत. याशिवाय शहर विकास आघाडीकडे 18 तर अपक्षांची मते 37 इतकी आहेत.

 

- मनसे- 6, बसप- 1, आरपीआय-5, एआयएम- 7, जनता दल- 6, जनशक्ती पॅनल- 5, माकप- 13 आदी छोट्या पक्षांच्या मतांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...