आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडे, टोपे, साबणे, दरेकर उत्कृष्ट संसदपटू; दोन्ही सभागृहाचे तीन वर्षातील पुरस्कार जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेवतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण या तीन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. 
विधानसभेसाठी डॉ. अनिल बोंडे (२०१५-१६), सुभाष साबणे (२०१६-१७) व राहुल कुल यांना (२०१७-१८) उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार तर उत्कृष्ट भाषणासाठी प्रा. वर्षा गायकवाड (२०१५-१६), राजेश टोपे (२०१६-१७) आणि धैर्यशील पाटील (२०१७-१८) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

विधान परिषद सदस्यांमधून उत्कृष्ट संसदपटू म्हणून अॅड. अनिल परब (२०१५-१६), विजय उर्फ भाई गिरकर (२०१६-१७), संजय दत्त (२०१७-१८) यांना मिळाला आहे, तर उत्कृष्ट भाषणासाठी अॅड. राहुल नार्वेकर (२०१५-१६), कपिल पाटील (२०१६-१७) व प्रवीण दरेकर (२०१७-१८) यांना जाहीर करण्यात आला. विधान परिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, विधान परिषदेचे सभागृह नेते, संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिवच्या निवड समितीने ही निवड केली आहे.

बातम्या आणखी आहेत...