आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- 24 वर्षाच्या अॅंकर, मॉडेल आणि होस्ट अर्पिता तिवारीच्या रहस्यमयी मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तिच्या बॉयफ्रेंडचा मित्र विकास हजारा याला अटक केली आहे. त्याच्यावर हत्या आणि हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. 11 डिसेंबर रोजी अर्पिताचा 15 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. घटनेवेळी फ्लॅटमध्ये असलेल्या सर्व पाच तरूणांची पॉलिग्राफ टेस्ट केली आहे. फारेन्सिक लॅबमध्ये झालेल्या या टेस्टआधी या सर्वांची चौकशी व म्हणणे रेकॉर्ड केले होते.
बॉयफ्रेंडने वाद झाल्याची दिली होती कबूली-
- अर्पिताच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी सर्वात प्रथम तिचा बॉयफ्रेंड पंकज जाधववर संशय व्यक्त केला होता.
- अर्पिताच्या बहिणेने आरोप केला होता की, पंकज आणि अर्पिता यांच्यात नेहमीच वाद, भांडणे होत होती. त्यामुळे दोघे वेगळे होऊ इच्छित होते.
- पंकजने दोघांतील वाद व भांडणे होत असल्याची कबुली दिली होती. त्याने पोलिसांना हे ही सांगितले होते की, त्याचे आणि अर्पिताचे जवळपास ब्रेकअप झाले होते.
- पंकजच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पंकज, अर्पिता आणि अमित तिघे हॉलमध्ये झोपले होते. तर इतर मित्र दुस-या खोलीत झोपले होते.
- पॉलीग्राफ टेस्ट दरम्यान सांगितलेले म्हणणे आणि पोलिसांना चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीत फक्त अमित हजारा याच्यात विसंगती आढळली.
- अमित हजारा बोलण्यात गडबड करत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सोमवारी त्याला अटक करून बोरिवली कोर्टात हजर केले. त्याला 20 जानेवारीपर्यंत पोलिस कस्टठी दिली आहे.
- अमित हजारा हा सुद्धा झारखंडचा आहे. अर्पिता सुद्धा जमशेदपूरची रहिवासी होती.
फिल्ममध्ये काम करण्यासाठी अर्पिता आली होत मुंबईत-
- अर्पिताने जमशेदपुर (झारखंड) मधील हिल टॉप स्कूलमध्ये शिक्षण घेतले होते. ज्यानंतर तिने मुंबईत इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केला. सोबतच अॅक्टिंगचा क्लास लावला होता.
- शेजा-यांच्या माहितीनुसार, अर्पिताला लहानपणापासून फॅशन आणि फिल्ममध्ये काम करण्याची इच्छा होती. त्याचमुळे ती मुंबईला गेली होती.
- अर्पिताच्या मृत्यूची माहिती मिळताच तिचे पिता आणि इतर लोक मुंबईत पोहचले होते. तिच्या घोडाबांधा येथील घराला त्यावेळी कुलूप लावलेले होते.
वडिलांनी फ्लॅटमधील पाचही जणांना ओळखले-
- अर्पिता तिवारीची बहिण श्वेता तिवारीने सांगितले होते की, ना ही घटना आत्महत्या आहे ना अपघात. हे सर्व प्लॅन्ड रेप आणि मर्डर आहे.
- पिता त्रिवेणी तिवारीने फ्लॅटमधील उपस्थित पाच लोकांना ओळखले. पाचही जण अर्पिताचा बॉयफ्रेंड व त्याचे मित्र होते.
- त्रिवेणी तिवारींच्या माहितीनुसार, अर्पिताच्या मृत्यूआधी फ्लॅटमध्ये तिचा बॉयफ्रेंड पंकज जाधव, अमित कुमार (ज्याने फ्लॅट भाड्याने घेतला होता), मनीष (अमितकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत होता), श्रवण ( अमितचा पेईंग गेस्ट) आणि मुन्ना (बदललेले नाव) कुक असे राहत होते.
- अर्पिताच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, घटनेच्या वेळी हेच पाच लोक होते त्यामुळे त्यांच्यातील एकाने तिचा खून केला.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज व माहिती...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.