आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईल काढण्‍यासाठी टॉयलेटच्‍या कमोडमध्‍ये घातला हात, बाहेर काढण्‍यासाठी अग्निशमन दलाला पाचारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मोबाईलच व्‍यसन तरूणांमध्‍ये इतक प्रचंड वाढल आहे की, आंघोळ आणि शौचालयाला जातानाही तरूण मोबाईल आतमध्‍ये घेऊन जातात. मात्र असे करणे एका तरूणाला चांगलेच भोवले आहे. 


कमोडमध्‍ये पडला मोबाईल, तरूणाचे हाल 
रोहित राजभर (19) असे या तरूणाचे नाव आहे. तो मुळचा उत्‍तर प्रदेशातील आझगढचा रहिवासी आहे. मुंबईत तो आपले काका लालमणी वर्मा यांच्‍या घरी आला होता. येथे शौचालयाला जाताना तो आपला मोबाईल सोबत घेऊन गेला. मात्र आतमध्‍ये त्‍याचा मोबाईल कमोडमध्‍ये पडला. त्‍यामुळे मोबाईल बाहेर काढण्‍यासाठी या तरूणाने चक्‍क कमोडमध्‍ये हात घातला. मात्र त्‍याच हात तेथेच अडकला. आटोकाट प्रयत्‍न करूनही तरूणाला हात बाहेर काढता आला नाही. इंडियन पद्धतीचे हे टॉयलेट होते. मोबाईल तर परत मिळाला नाहीच मात्र कमोडमधून हात कसा बाहेर काढावा हेही तरूणाला समजेनासे झाले. 

 

घरचेही प्रयत्‍न करून थकले 
अखेर कसेबसे एका हाताने टॉयलेटचा दरवाजा उघडत तरूणाने मदतीसाठी घरच्‍यांना आवाज दिला. घरातील सदस्‍यांनीही प्रयत्‍न करून पाहिला मात्र कोणालाही हात बाहेर काढता आला नाही. याचदरम्‍यान तरूणाचा हात प्रचंड दुखत असल्‍याचे त्‍याने सांगितले. अखेर घरच्‍यांनी अग्निशमन दलाला फोन लावला. थोड्यावेळाने अग्निशमन दल घटनास्‍थळी पोहोचले व त्‍यांनी तरूणाचा हात कमोडबाहेर काढला. नंतर हात दुखत असल्‍याने तरूणाला रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. तेथे त्‍याच्‍या हातावर उपचार करून त्‍याला घरी पाठवण्‍यात आले. 

 

बातम्या आणखी आहेत...