आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी भिडे-एकबोटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप;बीआरएसपीचे अध्यक्ष डॉ. माने यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कोरेगाव भीमा दगडफेक प्रकरणाचे सूत्रधार संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दंगलीसारख्या गंभीर गुन्ह्याप्रकरणी बाबा-दादाच्या आघाडी सरकारने कारवाया टाळल्या. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यावेळी कठोर भूमिका घेतली नाही, असा दावा करत भिडे- एकबोटे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे अध्यक्ष अॅड. सुरेश माने यांनी गुरुवारी केला. 


२००७ च्या मिरज दंगलीत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आरोपी होते, तर हिंदू एकता संघटनेशी संबंधित पुण्याचे माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांच्यावर ३५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यावेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या दोघांप्रती बोटचेपी भूमिका घेतली. त्यामुळे या मंडळीच्यात कोरेगाव भीमा हिंसाचार करण्याचे धाडस झाल्याचा दावा माने यांनी केला. राज्यात कायद्याचे राज्य नाही, ते असते तर भिडे आणि एकबोटे यांना अटक झाली असती, किमान जबाब तरी नोंदवले असते, असे माने म्हणाले. वढु बु येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीची देखभाल करण्याचे एकबोटे यांच्या संघटनेचे काम थांबवावे, अन्यथा पुन्हा असाच उद्रेक ही मंडळी घडवतील, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.  १ जानेवारी रोजी झालेल्या दगडफेकीची गुन्हे नोंद केले जात नाहीत.  मात्र, ३ जानेवारीच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या बंदमधील तोडफोडीचे सर्रास गुन्हे नोंद केले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. 

बातम्या आणखी आहेत...