आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय हाेईपर्यंत अामदार प्रशांत परिचारकांना परिषदेत प्रवेश नाही; सभापतींची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परिचारक यांना कायमस्वरूपी विधान परिषदेतून बडतर्फ करून देशद्रोहाचा खटला दाखल करावी ही मागणी रेटून धरली. - Divya Marathi
परिचारक यांना कायमस्वरूपी विधान परिषदेतून बडतर्फ करून देशद्रोहाचा खटला दाखल करावी ही मागणी रेटून धरली.

मुंबई- एकदा निलंबन मागे घेतल्यानंतर त्यानंतर प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करण्यासाठी मांडलेला दुसरा प्रस्ताव नियमात बसताे की नाही हे तपासून याेग्य ताे निर्णय घेतला जाईल, असे सभापती रामराजे निंबाळकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले. ताेपर्यंत परिचारक यांना सभागृहात उपस्थित राहू देऊ नये, असे निर्देशही सभापतींनी सरकारला दिले. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्यावर याेग्य कार्यवाही करणार असल्याचे ते म्हणाले.


लष्करी जवानांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या परिचारकांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी दाेन दिवसांपासून विधिमंडळाच्या दाेन्ही सभागृहांत  शिवसेनेसह सर्व विराेधी पक्षांचे अामदार अाक्रमक अाहेत. विधान परिषदेत  शिवसेनेचे अनिल परब यांनी परिचारक यांना बडतर्फ करावे, असा प्रस्ताव साेमवारी दिला हाेता. मंगळवारी कामकाज सुरू हाेताच ते म्हणाले,  ‘परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या निर्णयात दुरुस्तीसाठी माझा प्रस्ताव नाहीच. तर त्यांना बडतर्फ करावे, असा प्रस्ताव मी दिला अाहे. त्यावर प्रत्येक सदस्याला मत व्यक्त करण्याची परवानगी द्यावी. बडतर्फीवर निर्णय हाेत नाही ताेपर्यंत परिचारकांना सभागृहात पाय ठेवू देणार नाही. वेळप्रसंगी अामदारकीचा त्याग करावा लागला तरी चालेल,’ असा इशाराही परब यांनी दिला.  अाराेग्यमंत्री दीपक सावंत म्हणाले, ‘निर्णय हाेईपर्यंत परिचारक यांना वेतनभत्ते देऊ नयेत.’  


दरम्यान,  परिचारकांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव सभागृहात एकमताने मंजूर केल्यामुळे नियमाप्रमाणे अशा प्रकारचा ठराव पुढील एक वर्ष मांडता येणार नाही. मात्र, परब यांनी मांडलेला दुसरा ठराव नियमात बसताे की नाही हे तपासून पाहून याेग्य ताे निर्णय घेतला जाईल, असे सभापती म्हणाले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, विधीमंडळाच्या सहाव्या दिवसाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...