आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- राज्यात 2 लाख 39 हजार शेतीपंपाचे कनेक्शन प्रलंबित असून डिसेंबर 2019 पर्यंत राज्यातील सर्व कृषी पंपाना कनेक्शन दिले जातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर अतिभारीत झाले आहेत. त्यामुळे आता 2 शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर ही योजना आणण्यात असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
आमदार जयकुमार गोरे यांनी महावितरणकडून सातारा जिल्ह्यातील ग्राहकांना चुकीची वीज बिले देण्यात येत असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ऊर्जामंत्री उत्तर देत होते. या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले - वीज बिले दुरूस्तीसाठी यापूर्वीही शिबिरे लावण्यात आली होती पुन्हा अशी शिबिरे लावली जातील. तसेच म्हसवड परिसरासाठी 132/33 केव्ही उपकेंद्रासाठी जागा घेतली होती. नंतरच्या काळात हे काम झाले नाही. राज्याची 2030 पर्यंत विजेची मागणी किती होणार, कुठे वीज अधिक लागणार याचे संपूर्ण नियोजन महापारेषणने केले आहे.
केवळ ट्रान्सफॉर्मर अतिभारित असल्यामुळे कृषीपंपांचे कनेक्श्न प्रलंबित आहेत. यावर उपाययोजना म्हणून 2 शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर ही योजना लवकरच होत आहे. 2360 कोटींची ही योजना असून राज्यातील सर्व शेतकरी या योजनेत आणले जातील.तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. या योजनेचे काम सुरू झाले आहे. सदस्यांनी आपल्या भागातील शासकीय जमीन या योजनेसाठी उपलब्ध व्हावी यासाठी सहकार्याचे आवाहन ऊर्जामंत्र्यांनी केले.
या प्रश्नाच्या चर्चेत आमदार दीपक चव्हाण, भीमराव लोंढे, हसन मुश्रीफ, नसीम खान यांनी सहभागी होऊन उपप्रश्न विचारलेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.