आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांच्या तब्येतीचे विधान परिषदेत पडसाद;एक प्रकारे शासनच देत असल्‍याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अार्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना जे.जे. रुग्णालयात मिळणाऱ्या उपचाराचा मुद्दा अामदार कपिल पाटील यांनी साेमवारी अाैचित्याच्या मुद्द्याद्वारे विधान परिषदेत उपस्थित केला.  यावर उत्तर देताना सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात बाेलून कायद्याच्या चाैकटीत बसून काही करता येर्इल का ते पाहू, असे सांगितले. भुजबळांबाबत अढी ठेवून काम करणारे सभागृह नाही. सभापती रामराजे निंबाळकर यांनी भुजबळांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवता येऊ शकते का या दृष्टीने विचार करावा, असे निर्देश या वेळी सरकारला दिले.  


कपिल पाटील म्हणाले, भुजबळ यांच्यावर अाराेप सिद्ध झालेले नाहीत तरीही त्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवले जात अाहे. त्यांची प्रकृती अाता कशी अाहे? त्यांच्यावर याेग्य उपचार हाेत अाहेत की नाही याबाबत सभागृहाला अवगत करावे, अशी मागणी त्यांनी  केली. भुजबळ हे अामदार असतानाही त्यांना अाेपीडीच्या रांगेत सर्वसामान्यांप्रमाणे उभे राहावे लागते. त्यांना अनेक अाजार अाहेत. जे जे रुग्णालयात उपचार  घेताना त्यांना अनेक मर्यादा येत अाहेत. अशा वेळी त्यांना खासगी रुग्णालयात उपचार करण्याचा मानवाधिकार  मिळत नाही. एक प्रकारे शासनच त्यांना शिक्षा देत अाहे, असा अाराेप विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. काही प्रकरणांमध्ये कैद्यांना खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी दिली अाहे. त्याप्रमाणे भुजबळ यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी द्यावी, असे शेकापचे जयंत पाटील यांनी या वेळी सांगितले. राष्ट्रवादीचे जयंत जाधव  म्हणाले की, भुजबळ गेली दाेन वर्षे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत अाहेत. सभागृहाचे सदस्य असतानाही त्यांना मानवतेला शाेभणार नाही अशी वागणूक मिळत आहे.  माेठमाेठे गुन्हे करणाऱ्यांना खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी दिली गेली. डी.एस. कुलकर्णी यांना खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मिळते.  मग भुजबळांना का नाही. त्यांनाही नैसर्गिक न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करावा, असे या वेळी सांगितले.  

 

न्यायालयाच्या परवानगीने निर्णय घ्या  
माझ्या माहितीप्रमाणे अंडर ट्रायल कैद्याने अाराेग्याची तक्रार केली की त्याला तुरुंंग अधिकारी अाणि न्यायालय यांच्या परवानगीने खासगी रुग्णालयात नेता येऊ शकते. या प्रकरणात तुरुंग अधिकारी अाणि न्यायालय यांची परवानगी घेऊन तसे करता येर्इल का  याचा विचार करावा, भुजबळांना रांगेत उभे वगैरे राहावे लागणार नाही, याबाबत विचार करावा.

- रामराजे निंबाळकर, सभापती

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, भुजबळांवर जेजे रूग्णालयात उपचार सुरू....

बातम्या आणखी आहेत...