आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारधारेबद्दल डिवचल्याने महसूल मंत्री चंद्रकांतदादा अामदारांवर भडकले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रकांतदादांचा विधीमंडळात आज चांगलाच पारा चढला. - Divya Marathi
चंद्रकांतदादांचा विधीमंडळात आज चांगलाच पारा चढला.

मुंबई- लष्करी जवानांबद्दल बेताल वक्तव्य करणारे अामदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या मुद्द्यावरून साेमवारी विधानसभा व विधिमंडळात विराेधी पक्षाच्या अामदारांनी सरकारला जाब विचारला, त्यात शिवसेनाही सहभागी झाली हाेती.  ‘परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या प्रस्तावाला सहमती कोणत्या विचारधारेने दिली?’ असा सवाल  लाेकभारतीचे अामदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. त्यामुळे सभागृह नेते तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पारा चढला. ‘विचारधारेवर बोलाल तर याद राखा, आम्ही ऐकून घेणार नाही’ अशा शब्दात त्यांनी कपिल पाटील यांना सुनावले.  त्यावर मंत्री सभागृहात दादागिरीची भाषा करत अाहेत, असा अाराेप करत विराेधकांनी गाेंधळ घातला. 

 
मंत्री चंद्रकांत पाटील तसे शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात, परंतु कपिल पाटील यांनी वारंवार त्यांच्या पक्षाशी संबंधित विचारधारेचा उल्लेख केल्याने पाटील यांचा पारा चढल्याचे दिसून अाले. परिचारकांचे निलंबन रद्द होऊ नये या विषयावरील चर्चेत कपिल पाटील म्हणाले, ‘परिचारक यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सभागृहात बाेलावणे ही घातक परंपरा सुरू हाेर्इल. कारण त्यांनी जे शब्दप्रयाेग केले ती परंपरा या देशामध्ये ज्यांची अाहे ते सत्तेवर असतील तर हा प्रश्न अधिक गंभीर बनताे. त्यांच्या प्रस्तावाला अहवालाच्या माध्यमातून त्यांना परत बाेलावण्याची संमती काेणी दिली हे समजले पाहिजे. परिचारक जे काही बाेलले ते माफ करण्यालायक अाहे की नाही हे सरकारने अगाेदर स्पष्ट केले पाहिजे. काेणत्या विचारधारेतून त्यांचे निलंबन मागे घेण्यात अाले.’   यावर भडकलेले चंद्रकांत पाटील तावातावाने म्हणाले, ‘कपिल पाटील यांनी विचारधारेबद्दल एक वाक्य उच्चारले, मात्र अापण शांत बसलाे हाेताे. मात्र त्यांनी वारंवार या शब्दाचा उल्लेख केला. ताे कामकाजात जाेडता कामा नये. ते अाम्ही एेकून घेणार नाही.’ त्यावर कपिल पाटील यांनी मंत्री सभागृहात धमकीची भाषा वापरत असल्याचा अाराेप केला. विराेधी बाकावरील इतर सदस्यांनीही दाेन्ही सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र शाब्दिक वाद वाढतच गेला.  त्यामुळे सभागृहात गाेंधळ वाढतच गेला. परिणामी दिवसभरासाठी परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले.   

 

शरद पवारांबद्दल बाेलायला लावू नका : पाटील  

 

अामदार पाटील व चंद्रकांत दादा यांच्यातील वादात सभापतींनी हस्तक्षेप केला. ‘‘मला वाटते कपिल पाटील हे विचारधारेवर बाेलले नाहीत. तरीही मी सभागृह नेत्यांना सांगू इच्छिताे पाटील विषयाला साेडून काही बाेलले असतील आणि ते अाक्षेपार्ह असेल तर कामकाजातून काढून टाकू,’ असे सभापती म्हणाले. मात्र  तरीही संतप्त झालेले चंद्रकांत पाटील जाेरजाेरात बाेलत हाेते. तेव्हा सभापतींनी कपिल पाटील यांना पुढे बाेलण्यास परवानगी दिली. मात्र, गाेंधळ वाढतच गेला. त्यावर ‘मला शरद पवारांबद्दल बाेलायला लावू नका,’ असे चंद्रकातदादा म्हणाले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती .....

बातम्या आणखी आहेत...