आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: उद्योगपती जिगर ठक्कर यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्योगपती जिगर ठक्कर... - Divya Marathi
उद्योगपती जिगर ठक्कर...

मुंबई- विदर्भातील गोसीखुर्द सिंचन घोटाळ्यातील आरोपी व उद्योगपती जिगर प्रविण ठक्कर (41) यांनी मरीन ड्राईव्ह येथील नरीमन पाईंटवर डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. जखमी अवस्थेत जिगर यांना एनसीपीएसमोरील जीटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना मृत घोषित करण्यात आले. गोसीखुर्द सिंचन प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी एसीबीने 12 लोकांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते त्यात जिगर यांच्या नावाचा समावेश होता.

 

ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता घडली. जिगर ठक्कर आपल्या ड्रायव्हरसह चेंबूर येथे गेले होते. त्यांची गाडी हॉटेल मरीन प्लाझाच्या समोर उभी होती. त्यावेळी जिगर मागे बसले होते. जिगर यांनी ड्रायव्हरला बाहेर जाण्यास सांगितले. ड्रायव्हर गाडीच्या बाहेर जाताच जिगर यांनी आपल्या जवळील पिस्तूल काढला व डोक्यात झाडून घेतली. 

 

गोळीचा आवाज ऐकून ड्रायव्हर तत्काळ गाडीकडे धावला त्यावेळी त्याला जबर धक्का बसला. मात्र, त्याने तत्काळ गाडी हालवत रूग्णालयात धाव घेतली. मात्र, जीटी रूग्णालयात जिगर यांना मृत घोषित करण्यात आले.

 

पोलिसांनी जिगर यांच्याकडील परवानाधारक रिवॉल्वर आणि कार जप्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की, रिवॉल्वर बॅलेस्टिक तपासासाठी पाठवले आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांना जीटी रूग्णालयाने याची आधीच माहिती दिली होती. पोलिसांनी पंचनामा केला आहे तसेच ड्रायव्हरकडून माहिती घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच ठक्कर कुटुंबिय रूग्णालयात पोहचले. 

बातम्या आणखी आहेत...