आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BYPOLL: EVM च्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह, बॅलेट पेपरने मतदान घ्या - प्रफुल्ल पटेल यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील पालघर व भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान होत आहे. EVM मशिन बंद पडण्याच्या तक्रारी वगळता मतदान शांततेत पार पडत आहे. मात्र, ईव्हीएमच्या घोळ व कडक उन्हामुळे नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळाला. सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 35 टक्के मतदान झाले   होते. ईव्हीएम   मशिन्स बंद पडल्याने अनेक ठिकाणी तास-दोन तास वाया गेले आहेत त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत मतदान करून घेऊ असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का काही प्रमाणात वाढेल असे सांगितले जात आहे. 

 

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची पत्रकार परिषद- EVM च्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह- 

 

- अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया बंद केल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे फेरमतदान घेण्याची राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची मागणी.

 

- तसेच फेरमतदान घेतल्याशिवाय मतमोजणी करू नये अशीही मागणी त्यांनी केली.

 

- ईव्हीएम मशिन्स जर कडक उन्हामुळे बंद पडत असतील तर झालेल्या मतदान सुरक्षित राहील याची कोण हमी देणार- प्रफुल्ल पटेल

 

- यूपीतील कैराना लोकसभा पोटनिवडणुकीतही अशीच स्थिती आहे अशी माहिती मला आताच फोन करून सपाप्रमुख अखिलेश यादव यांनी दिली आहे.

 

- जगात सर्व प्रगत राष्ट्रे जर बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेतात तसेच भारतातील ईव्हीएमच्या तक्रारी लक्षात घेता बॅलेट पेपरद्वारे भारतातील निवडणूका घेतल्या जाव्यात अशी मागणी पटेल यांनी केली.

 

ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा प्रथमच वापर- 

 

- पालघर व भंडारा-गोंदिया या दोन्ही लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशीनचा वापर करण्यात येत आहे.

 

- गुरुवारी (ता.  31) मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

- भाजपचे माजी खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे व भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या.

- दरम्यान, पालघरमध्ये कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल डहाणू तहसीलदार कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार संजय वामन नागावकर यांना निलंबित करण्यात आले आहे.

 

- पालघरमध्ये शिवसेनेने दिवंगत चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वनगा यांना अापल्या पक्षातर्फे उमेदवारी दिली अाहे. तर भाजपने माजी मंत्री राजेंद्र गावित यांना काँग्रेसमधून पक्षात अाणून उमेदवारी दिली. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली अाहे. भंडारा-गाेंदिया मतदारसंघात भाजपचे हेमंत पटले व राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे या दाेन माजी अामदारांत प्रमुख लढत हाेत अाहे. उत्तर प्रदेशमधील कैराना मतदारसंघात व नागालँडमधील एका जागेवरही आजच लाेकसभा पाेटनिवडणूक हाेणार अाहे.

 

कैराना (उत्तर प्रदेश) लोकसभा पोटनिवडणूक

 

तबस्सुम हसन, राष्ट्रीय लोक दल v/s मृगांका सिंह, भाजपा

 

का होतेय पोटनिवडणूक: भाजप खासदार हुकुम सिंह यांच्या निधनामुळे

 

भाजप विरूद्ध उर्वरित सर्व पक्ष अशी लढत-

 

- कैराना लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची विरोधी पक्षांनी मोठी कोंडी केली आहे. राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार तबस्सुम यांना सपा, बसपा, काँग्रेस आणि आपने समर्थन दिले आहे. 

 

नागालँड

 

तोखेयो येपथोमी, पीडीए v/s सीए अपोक जमीर, एनपीएफ

 

का होतेय पोटनिवडणूक: विद्यमान मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी राजीनामा दिला. ते भाजपचे समर्थन असणा-या नागा पीपुल्स फ्रंट पक्षाचे आहेत.

 

- कधी 86% मते मिळवणारी काँग्रेस मागील 3 निवडणुकात विजयी होऊ शकलेली नाही.

- या जागेवर सध्या दोनच उमेदवार आहेत. नागालँडमधील ही एकमेव लोकसभेची जागा आहे.

- या जागेसाठी मुख्य लढत काँग्रेसचे समर्थन असणा-या पीपुल्स डेमोक्रेटिक अलायंस (पीडीए) आणि भाजपचे समर्थन असणा-या नागा पीपुल्स फ्रंट (एनपीएफ) यांच्यात होत आहे.

- मागील तीन निवडणुकीत ही जागा एनपीएफला मिळाली आहे. त्याआधी येथील जागेवर काँग्रेसचा ताबा होता.

- 1998 च्या निवडणुकीत येथे काँग्रेस उमेदवाराला 86.70% मते आणि 1999 मध्ये 71.18% मते मिळाली होती. 2004 नंतर एनपीएफने काँग्रेसला येथून हद्दपार केले आहे.

 

ईव्हीएम बंदच्या तक्रारी-

 

- पालघरमध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिन्समध्ये बिघाड झाल्याने मतदान बंद आहे.

- भाजपने काही अधिका-यांना हाताशी धरून हे विरोधी पक्षांची ताकद असलेल्या भागात जाणून-बुझून मतदान बंद पाडल्याचा हितेंद्र ठाकूर यांचा आरोप

- भंडारा- गोंदियात 450 हून अधिक ठिकाणी ईव्हीएम मशिन्स बंद पाडल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप.

- दोन तासांहून अधिक काळापासून मतदान बंद, त्यामुळे दोन तास मतदान करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची काँग्रेस आघाडीची मागणी

- गोसी खुर्द धरण प्रकल्पात जमिन गेलेल्या 35 गावांनी मतदानावर बहिष्कार घातला.  

- गोंदियात 35 ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याने मतदानप्रक्रिया बंद

बातम्या आणखी आहेत...