आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 महिन्यात दुसऱ्यांदा केला मृत्यूचा सामना, जिवंत राहिल्यास पूर्ण झाली असती ही इच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशा ही सीएच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती. - Divya Marathi
यशा ही सीएच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती.

मुंबई- लोअर परळ येथील कमला मिल कॅम्पसमध्ये गच्चीवर बनविण्यात आलेल्या पबमध्ये सुरु असणाऱ्या बर्थ डे पार्टीचा जल्लोष दुख:त बदलला. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीमध्ये अहमदाबाद येथे राहणाऱ्या सीएची विद्यार्थिनी यशा ठक्कर हिचाही समावेश आहे. सहा महिन्यापूर्वी यशाच्या कारला आग लागली होती. त्यावेळी मृत्यूच्या दाढेतून वाचली होती. पण यावेळी तिला नशिबाने साथ दिली नाही. ती पहिल्यांदाच मुंबईत आली होती. मुंबई नववर्ष साजरे करण्याची तिची इच्छा अपुर्णच राहिली. 

 

डिनरसाठी आली होती यशा
- गुरुवारी रात्री पबमध्ये अनेक लोक रात्रीचे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यातील कुणालाही माहिती नव्हते की हे त्यांचे अंतिम जेवण ठरणार आहे. 

- यापैकी यशा ठक्करही एक होती. यशा सीएची परिक्षा दिल्यानंतर नवे वर्ष साजरे करण्यासाठी मुंबईत आली होती.  

- तिची मुंबईत नवे वर्ष साजरे करण्याची अंतिम इच्छा अपूर्ण राहिली. नव वर्ष सुरु होण्याच्या दोन दिवस आधीच तिचा मृत्यू झाला. ती आपली नातलग मानसी सोबत '1 अबव' या पबमध्ये डिनरसाठी आली होती.

- यशाचे अंकल देवेंद्र ठक्कर यांनी सांगितले की, तिचा मृत्यू गुदमरल्याने झाला आहे. मानसीला किरकोळ जखमा झाल्या आहेत. मानसी स्वत:ला वाचविण्यात यशस्वी ठरली. त्या दोघी नातलग तर होत्याच पण जीवलग मैत्रिणीही होत्या. या घटनेने मानसीला मानसिक धक्का बसला आहे.

- यशाचा मृतदेह अहमदाबाद येथे नेण्यात आला. या घटनेनंतर यशाचे अंकल आशिष शाह लंडनला जाणे रद्द केले आहे. ते शुक्रवारी लंडनला जाणार होते. त्यांनी सांगितले की ती अभ्यासात खूपच हुशार होती व मॉडेलिंगसाठी प्रयत्न करत होती. 

 

6 महिन्यांपूर्वी वाचला होता यशाचा जीव
- या घटनेपूर्वी 6 महिने आधी यशा आणि तिचे पती अलाप यांचे प्राण एका रस्ते अपघातात वाचले होते. ती आपल्या पतीसोबत कारमधून जात असताना कारला अचानक आग लागली होती. कसेबसे ते कारमधून बाहेर निघल्याने त्यांचे प्राण वाचले होते.

- यशा आणि अलाप यांची भेट सीएचा अभ्यास करतानाच झाली होती आणि गतवर्षी त्यांनी विवाह केला होता. शुक्रवारी अलाप मुंबईत येणार होते. त्यानंतर ते दोघे मिळून नवे वर्ष साजरे करणार होते.

- आग लागण्याच्या एक तास अगोदर तिने आपल्या पतील मॅसेज केला होती की ती त्यांना मिस करत असून लवकर या.   

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...