आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर मित्रांनी लावली कारची शर्यत, तरूणींसह तिघांचे गेले बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाण्यातील तीन तरूणांचा मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर खालापूरजवळ अपघातात मृत्यू झाला आहे. बर्थ डे सेलिब्रेशनसाठी लोणावळ्याला दोन कारमध्ये गेलेले दहा मित्र-मैत्रिणी परतत असताना हा अपघात झाला. भरधाव एक्स्प्रेसवर कारची शर्यत लावल्याने हा अपघात झाला यात स्वधा दुबे नावाच्या तरूणीसह दोन तरूणांचा मृत्यू झाला. 

 

याबाबतची माहिती अशी की, मृत तरूणी स्वधा दुबे आपल्या दहा मित्रमैत्रिणींसह मंगळवारी लोणावळ्याला मित्राचा बर्थ डे सेलिब्रेशन करायला गेली होती. स्वधा दुबे ठाण्यातील ब्रम्हांड सोसायटीत राहते. सध्या ती फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत होती. आपल्या मित्राचा लोणावळ्यात वाढदिवस साजरा केला. मंगळवारी रात्री लोणावळ्याहून ठाण्याकडे परतत असताना उत्साहाच्या भरात मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर दोन्ही कारमध्ये शर्यत लागली. दोन कारमध्ये पाच-पाच असे मित्र बसले होते. खालापूरजवळ कार आली असता ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वेगाने धावणारी त्यांची पोलो गाडी दुस-या गाडीवर जाऊन धडकली. यात स्वधा दुबेसह तिच्या दोन मित्रांचा जीव गेला. सोबतच त्या पोलो कारमध्ये बसलेले आणखी इतर दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. 

 

या अपघातानंतर दुस-या कारमधील पाच मित्रांना या घटनेचा प्रचंड धक्का बसला. त्यांना आपल्याच कृत्याचा (एक्स्प्रेसवर कारची शर्यत लावण्याचा) प्रचंड राग आला. त्यांनी काही वेळ आदळआपट केली व आपापले मोबाईल हायवेवर फोडून टाकले. आता घरी काय सांगायचे म्हणून त्यांनी सर्वांचे मोबाईल फोडून टाकले. मात्र, येणा-या जाणा-या वाहनचालकांनी पोलिसांना माहिती कळवली. यानंतर जखमींना रूग्णालयात दाखल केले.

 

मात्र, स्वधासह दोघांचा तोवर मृत्यू झाला होता. तर आणखी दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. या घटनेचा मित्रांना मोठा धक्का बसल्याचे जाणवत होते. मात्र, वेगात गाडी चालवण्याच्या नादात तीन तरुणांचा हकनाक बळी गेला आहे. 

बातम्या आणखी आहेत...