आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज अनुदान बंदीवर राज ठाकरेंचे \'व्यंगचित्र\'; पाहा याआधी कुंचल्याच्या साहाय्याने नोंदवलेल्या प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मोदी सरकारने जाहीर केलेल्या हज अनुदान बंद करण्याच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया कुंचल्याच्या साहाय्याने नोंदवली आहे. 'अनुदान आणि राष्ट्रधर्म' असे शीर्षक दिलेले एक व्यंगचित्र राज ठाकरेंनी 'फेसबुक'च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

 
 
 

अनुदान काढून घेतानाच बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशातून हाकलून देण्याचा सूचक इशारा पंतप्रधान मोदींना राज ठाकरेंनी आपल्या या व्यंगचित्रातून दिला आहे. मुस्लिमांना हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान केंद्र सरकारने रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2012 साली दिलेल्या निर्देशानुसार सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. यावर एमआयएमचे खासदार यांनी भाजप सरकारला काशी, अयोध्या, मानसरोवर अशा हिंदू यात्रांसाठी दिले जाणारे अनुदान बंद करण्याचे आव्हान दिले आहे.

 

 

 

पुढील स्लाईडवर पाहा राज ठाकरेंनी रेखाटलेली वेगवेगळी व्यंगचित्रे

बातम्या आणखी आहेत...