आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत रस्त्याच्या कडेला कारचालकाने केले अमानवीय कृत्य, समोर आला LIVE व्हिडिओ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालेली ही घटना- यात कुत्र्यांवर कार चढवताना चालक दिसत आहे. - Divya Marathi
सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालेली ही घटना- यात कुत्र्यांवर कार चढवताना चालक दिसत आहे.

मुंबई- मुंबईतील मुलुंड भागात एका कार चालकाने फुटपाथवर थांबलेल्या काही कुत्र्यांवर गाडी चालवून निर्दयीपणाचा कळस केला. त्याचे हे अमानवीय कृत्य सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. कार खाली आलेल्या तीन कुत्र्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे. तर इतर दोन कुत्री गंभीर जखमी झाली आहेत. याप्रकरणी या एक अॅनिमल अॅक्टिविस्टने बुधवारी कार मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.​ तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे जाणूनबुझून घातली अंगावर कार...

 

- उपलब्ध माहितीनुसार, मुलुंड वेस्ट भागात ड्रीमलॅंड सोसायटीच्या बाहेर झालेली ही घटना 7 डिसेंबर रोजीची आहे.
- सोसायटीत राहणा-या पलका सेजपाल यांनी सांगितले की, माझ्या समोरील कारने ज्याचा नंबर MH 04 FZ 7490 आहे, त्याने रस्त्याच्या कडेला बसलेल्या तीन कुत्र्यांना निर्दयीपणाने चिरडले.
- कुत्र्यांना चिरडल्यानंतर तो थांबला नाही तसेच तेथून वेगाने निघून गेला. यानंतर सेजपालने या तीन कुत्र्यांना उचलले आणि जनावरांच्या दवाखान्यात नेले. 
- पलकाच्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये पोहचण्याआधीच कुत्र्यांचा मृत्यू झाला होता.
- यानंतर पलकाने सोसायटीच्या बाहेर लावलेल्या कॅमे-यातील सीसीटीव्ही फुटेज खंगाळले. त्यानंतर त्याच्या शेजारच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. 
- व्हिडियो फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक कार रस्त्याच्या कडेला बसलेल्या कुत्र्यांना निर्दयीपणाने चिरडत आहे.
- पलकाचे म्हणणे आहे की, हे अशक्य आहे की, रस्त्याच्या कडेला बसलेली कुत्रे त्या व्यक्तीला दिसली नसतील.
- व्हिडिओ पाहून हे स्पष्ट दिसतेय की, त्याने जाणून बुझून कुत्र्यांच्या अंगावर गाडी घातली.
- पलकाच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात बुधवारी मुलुंड पोलिस स्टेशनमध्ये केस दाखल केली.
- चौकशी अधिका-याने सांगितले की, आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत. आम्ही आरोपीविरोधात IPC च्या कलम 279, 429, 184, 119, PCA (11) A सह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोबतच आरोपीची कार जप्त केली आहे.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या घटनेशी संबंधित फोटो ...

बातम्या आणखी आहेत...