आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत लोकल सिग्नल तोडून सुसाट, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाण्यावरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणा-या जलद लोकलने घाटकोपर स्टेशनजवळ सिग्नल तोडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या मुळे मोठा गोंधळ उडाला. 

 

ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद लोकल सिग्नल तोडून पुढे गेली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. जलद मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली. त्याचा प्रवाशांना मोठा फटका बसला. अनेक लोकल विद्याविहार आणि घाटकोपर स्थानकांदरम्यान अडकून पडल्या. एका पाठोपाठ एक अशा लोकलच्या रांगा लागल्याने अनेक प्रवाशांना ट्रॅकवर उतरुन पायपीट करावी लागली. 

बातम्या आणखी आहेत...