आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळ सोमवारी घरी परतणार, धनंजय मुंडे यांनी केईएम प्रशासनाशी केली चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शुक्रवारी जामीन मंजूर झाल्यानंतर केईएम रुग्णालयात दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सोमवारी तब्बल सव्वादोन वर्षांनी घरी परतणार अाहेत. कार्यकर्ते त्यांच्या जंगी स्वागताचे नियोजन करत आहेत.

 

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी भुजबळांच्या प्रकृतीबाबत केईएम प्रशासनाशी चर्चा केली. आधीच रक्तदाब, मधुमेह व दम्याने त्रस्त भुजबळांना पॅनक्रियाटिस झाला आहे. स्वादुपिंड संसर्गामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे. ते केईएमच्या गॅस्ट्राेलॉजी विभागात दाखल आहेत. सूत्रांनुसार, भुजबळ कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात उपचार करण्याचे ठरवले आहे.

बातम्या आणखी आहेत...