आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या पुण्यातील मेळाव्याला उपस्थित राहणार, कोर्टाने दिली परवानगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पुण्यात होणा-या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20 व्या स्थापनादिन व हल्लाबोल आंदोलन सांगता सभेला उपस्थित राहणार आहेत. छगन भुजबळ यांनी पुण्यातील पक्षाच्या सभेला जाण्यासाठी ईडीच्या कोर्टाकडे परवानगी मागितली होती ती त्यांना बुधवारी देण्यात आली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस यंदाच्या वर्धापन दिनी पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. या सभेला राष्ट्रवादीचे देशभरातील नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तुरूंगातून नुकतेच बाहेर आलेले पण आजारपणामुळे विश्रांती घेत असलेल्या भुजबळ यांनीही पक्षाच्या व्यासपीठावर उपस्थित राहण्यासाठी पक्षाकडून विनंती करण्यात आली. मात्र, मुंबई कोर्टाने छगन भुजबळ यांना जेव्हा जामीन मंजूर केला तेव्हा मुंबई शहराबाहेर न जाण्याची अट घातली होती. त्यामुळे पुण्यातील सभेला जाण्यासाठी छगन भुजबळ यांनी ईडीच्या कोर्टाकडे विनंती केली होती. भुजबळांची ही विनंती मान्य करत पुण्यात जाण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. आता ते पुण्यातील पक्षाच्या कार्यक्रमात काय भाष्य करतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. 

बातम्या आणखी आहेत...