आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांना केवळ जामीन, ते निर्दोष ठरले नाहीत! पुन्हा तुरूंगाची हवा खातील- अंजली दमानिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादीचे बडे नेते असलेले छगन भुजबळ यांना 26 महिन्यानंतर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह भुजबळांच्या नाशकात यामुळे आनंदोत्सव सुरू आहे. मात्र, भुजबळांच्या जामीनानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी त्यांच्यावर टीकाटिप्पणी केली आहे. छगन भुजबळ यांना केवळ जामीन मंजूर झाला आहे. ते निर्दोष ठरले नाहीत. त्यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे काही दिवसांनी छगन भुजबळांना पुन्हा तुरूंगात जावे लागेल, असेही दमानिया यांनी म्हटले आहे. 

 

छगन भुजबळ यांना 26 महिन्यानंतर मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. पाच लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली तर भुजबळ आजच सहाच्या आत तुरूंगाबाहेर येऊ शकतात, असे त्यांचे वकिल सुजय कांतावाला यांनी सांगितले आहे.

 

14 मार्च 2016 रोजी छगन भुजबळ यांना अटक झाली होती. तेव्हापासून तब्बल 26 महिने ते तुरूंगात होते. यादरम्यान, त्यांना अनेक आजारपणाला तोंड द्यावे लागले. मात्र, आता भुजबळ यांना जामीन मंजूर होताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे आणि नवाब मलिक यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले. तर तिकडे नाशकात भुजबळ समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

बातम्या आणखी आहेत...