आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ICICI बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर, सीओओ पदी संदीप बक्षी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आयआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर या चौकशी होईपर्यंत रजेवर जाणार आहेत. याबाबत बॅंकेने पत्रक काढून ही माहिती दिली आहे. तर बॅंकेचे होलटाईम डायरेक्ट आणि चिफ आॅपरेटिंग आॅफिसर (सीओओ) म्हणून संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

चंदा कोचर यांनी 30 मे रोजी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत त्यांनी बॅंकेचा बोर्डाला कळवले होते. त्यांचा अर्ज बोर्डाने मंजूर केला असून यांच्या रजेदरम्यान सीओओ हे बॅंकेचा बोर्डाला रिपोर्ट करतील. असे पत्रकात सांगण्यात आले आहे.  कोचर या रजेवर गेल्या तरी त्या एमडी आणि सीईओ असणार आहेत. पण अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत सुट्टीवर राहतील असे बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...