आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अार्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा विद्यार्थ्यांचे मेडिकलचे निम्मे शुल्क सरकार भरणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वैद्यकीय व दंतवैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ८ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क राज्य सरकार भरणार अाहे. अार्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.


मराठा अारक्षण मुद्द्यावर पाटील म्हणाले, ‘हा विषय कोर्टाकडे असून मागास आयोगाचे कामही वेगाने सुरू आहे. अहवालानंतर सरकार न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार अाहे. मराठा समाजातील तरुण व्यवसायात पुढे यावा म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ३ योजना आखल्या आहेत. वैयक्तिक व गटांसाठी व्याज प्रतिपूर्ती योजनेतून प्रत्येकी १० व ५० लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याज शासन भरेल. योजनेसाठी ७ हजारांवर युवकांना लेटर ऑफ इंटेंट दिले आहे. केंद्राच्या योजनातून सुमारे ४५० कोटींचा निधी मिळवला आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, मराठा समाजाला काेण पैसा पुरवतेय याबाबत माहिती आहे- चंद्रकांत पाटील...   

बातम्या आणखी आहेत...