आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पायलट मारिया झुबेर यांचे प्रसंगावधान, ...तर 40- 50 मजूरांचा मृत्यू झाला असता!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आज दुपारी मुंबईतील पश्चिम घाटकोपरमधील जीवदया लेनमध्ये उद्योगपती दीपक कोठारी यांच्या यूवाय एव्हिएशन कंपनीचे खासगी चार्टर्ड विमान कोसळले. यात महिला पायलटसह एकून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, महिला पायलट मारिया झुबेर यांनी प्रसंगावधान राखत मोठी जीवितहानी टाळली आहे. 

 

घाटकोपर पश्चिम हा परिसर संपूर्ण रहिवासी व दाट वस्तीचा भाग आहे. मात्र, विमानात बिघाड झाल्याचे लक्षात मारिया यांनी मोकळी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, रहिवासी भाग असल्याने त्यांना अडचण येत असावी. अखेर जीवदया लेनमधील एका निर्माणाधीन इमारतीवर त्यांनी विमान कोसळवले. याआधी विमानाने तेथे तीन-चार घिरट्या घातल्या. या निर्माणाधिन इमारतीत लोक तर नाहीत ना याचा अंदाज मारिया घेत असाव्यात. मात्र, कोणीही नाही हे पाहून त्यांनी हे विमान पाडल्याची शक्यता आहे. दरम्यान, या इमारतीवर 40 ते 50 कामगार काम करत होते. मात्र, दुपार 1 ते 2 ही जेवणाची वेळ असल्याने हे सर्व कामगार जेवायला गेले. त्याचवेळी सव्वा एक ते दीडच्या सुमारास ही घटना घडली. 

 

या अपघातातील ठळक मुद्दे-

 

- महिला पायलट मारिया झुबेर यांचे प्रसंगावधान, रहिवासी भागाऐवजी निर्माणाधीन इमारतीवर विमान पाडले.


- केवळ नशिब बलवत्तर म्हणून या निर्माणाधीन इमारतीवर 40 ते 50 कामगार बचावले. दुपारी 1 ते दोन यावेळी जेवणाची सुट्टी होती. त्यामुळे सर्व कामगार जेवायला गेले होते. त्याचवेळी तेथे विमान कोसळले. 

 

- अन्यथा मोठी जीवितहानी घडली असती मात्र या इमारतीवर विमानाने तीन ते चार वेळा घरट्या घातल्या. याचा अर्थ पायलट मारिया कुबेर या येथे लोक नाहीत याचा अंदाज घेत असाव्यात. दरम्यान, विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला असून, अपघात नेमका कसा घडला तो पुढे येऊ शकते. 

 

- ब्लॅक बॉक्समध्ये अपघाताच्या वेळी पायलट व इतर सहका-यांचे नेमके काय काय बोलणे झाले ते रिकॉर्डिंग होते. त्यामुळे यातून अपघाताची उकल करता येते. 

 

- हे अपघातग्रस्त चार्टर्ड विमान उत्तर प्रदेश सरकारने कोठारी बंधू यांच्या यूआय एव्हिएशन या कंपनीला  2014 साली विकले होते. व्हीटी यूपीझेड किंग एअर सी- 90 असे या विमानाचे नाव आहे. 

 

- या चार्टर्ड विमानाचा यूपी सरकारकडे असताना अपघात झाला होता. त्यानंतर हे विमान सरकारने विकले होते अशी माहिती यूपी सरकारचे मुख्य सुरक्षा सल्लागार अवनिश अवस्थी यांनी सांगितले.

 

- दरम्यान, या विमानाची दुरूस्ती करून आज सकाळीच नारळ फोडून त्याचे जुहू हेलिपॅडवरून टेस्टिंगसाठी उड्डाण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही वेळात ते कोसळले. यात महिला पाटलट मारिया झुबेर, को-पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ मनिष पांडे आणि सुरभी यांचा जागीच मृत्यू झाला. पादचारी गोविंद पंडित यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...