आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये असे पहिल्यांदाच घडत आहे की जगात सर्वोत्तम काम करणाऱ्या 5 महिला एकत्र येत आहेत. यात भारताकडून माणदेशी फाऊंडेशन चालविणाऱ्या चेतना गाला सिन्हा यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत क्रिस्ट्रीन लेगार्डे (IMF), नॉर्वेच्या पंतप्रधान एरना सोलबर्ग, आयबीएमच्या अध्यक्षा जिनी रोमेटी या आहेत. हे संमेलन दावोस येथे 23 ते 26 जानेवारी दरम्यान होत आहे. चेतना या प्राध्यापिका होत्या पण महिलांच्या स्थिती पाहून त्या हादरल्या आणि त्यांनी नोकरी सोडून या महिलांसाठी फाऊंडेशन स्थापन करुन त्यांच्यासाठी कामाला सुरुवात केली.
मुंबई विद्यापीठातून इकोनॉमिक्समध्ये मास्टर डिग्री
- मुंबईत कच्छी गुजराती गाला कुटूंबात पाच भाऊ होते. संयुक्त कुटूंबातील हे पाच भाऊ नळ बाजारात किराण्याचे दुकान चालवत होते. त्यापैकीच एक मगनलाल गाला यांची चेतना ही एक मुलगी आहे. चेतना यांना 4 बहिणी आणि 2 भाऊ आहेत.
- 'दिव्य मराठी'शी बोलताना चेतना म्हणाल्या की, अर्थशास्त्राविषयी मला आवड असल्याने मी मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्रात मास्टर्स डिग्री घेतली.
- त्याच काळात जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरु होते. मी या आंदोलनात सहभागी झाली. नंतर मला प्राध्यापकपदाची नोकरी मिळाल्याने मी ती नोकरी करत होते.
- मी आणि विजय सिन्हा या आंदोलनाशी निगडित असल्याने आम्ही माणदेशात 1981 साली आलो. त्याचवेळी रोजगार हमी योजना सुरु झाली होती. रोजगारासाठी महिला दगड फोडण्याचे काम करत होत्या.
- त्या काळात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याना हे काम दिले जायचे. मला प्रश्न पडला की, केवळ पोट भरण्यासाठी या महिलांना हे काम करावे लागत आहे.
- या महिलांना अन्य काही काम देण्याची गरज मला वाटत होती.
असे बदलले 3 लाख महिलांचे जीवन
- त्याच काळात एक घटना घडली. चाकु धार लावण्याचे काम करणारी एक महिला बँकेत बचत खाते उघडू इच्छित होती. पण तिला बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी दाद देत नव्हते.
- या महिलेने मला सांगितले की उन्हाळ्यात माणदेशात 49 डिग्रीपर्यंत तापमान असते. त्यामुळे लहान मुलांना चक्कर येते. मी माझ्या बाळाला या काळात झोपडीत सुरक्षित ठेवू इच्छिते.
- मी 1986 साली विवाहबध्द झाल्यावर नोकरी सोडून या महिलांची मदत करण्याचा निर्णय घेतला.
- महिलांना मदत करण्यासाठी 1996 साली एक सहकारी बँक सुरु करण्याचा निर्णय घेतला. पण रिझर्व्ह बॅंकेने प्रमोटर असणाऱ्या महिला शिक्षित नसल्याने परवानगी नाकारली.
- त्यानंतर चेतना यांनी या भागात जाऊन शिक्षणाचे महत्व सांगण्यास आणि लोकांना शिकविण्यास सुरुवात केली. बंधारे बांधण्याची कामे सुरु केली. यामुळे या भागात काही प्रमाणात का होईना कायापालट झाला.
- याच काळात त्यांनी बॅंकेसाठी पुन्हा अर्ज केला. यात त्यांना यश आले आणि माणदेशी बँक सुरू झाली. आज माणदेशी बँकेच्या खातेदारांशी संख्या 90 हजार आहे. तर 3 लाख 10 हजार महिलांनी त्यांच्याकडून विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.