आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहू महाराजांबाबत या गोष्‍टी आपल्‍याला माहितच हव्‍या, पाहा त्यांचे दुर्मिळ फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बहुजनांना गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून नवीन जीवन देणारे थोर समाज सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज जन्‍मदिवस (26 जून 1874). राजसत्तेच्‍या आधारे त्‍यांनी बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय राबवले. शाहूंनी जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, धरणे, रस्ते अशा विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे.

 

छत्रपती शाहू महाराज यांच्‍या जन्‍मदिवसानिमित्‍त या संग्रहात शाहू महाराजांचे अत्‍यंत दुर्मिळ फोटो आम्‍ही मांडत आहोत. महाराजांविषयी काही खास बाबीही आपल्‍याला येथे वाचता येतील.

 

बालपणीचे नाव होते यशवंतराव..

 

शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. 17 मार्च 1884 रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर ‘शाहू महाराज’ असे नामकरण झाले.

 

आरक्षणाचे प्रणेते..

 

मागासलेल्या वर्गाना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, अशी कल्पना महात्मा जोतिबा फुले यांनी मांडली.राजर्षी शाहूंनी आपल्या अधिकारांचा वापर करून ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. 6 जुलै 1902 रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50 % जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. त्याची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागविले.

 

पुढील स्‍लाईड्सवर क्‍लिक करुन पाहा, शाहू महाराजांबाबत आणखी माहिती व दुर्मिळ फोटो..

बातम्या आणखी आहेत...