आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेला हायकोर्टाचा दिलासा मात्र नवी मुंबईत नो इंट्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारप्रकरणी अंडरवर्ल्ड डाॅन छोटा राजनचा भाऊ दिपक निकाळजेला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. कोर्टाने या प्रकरणात निकाळजेला 11 जून पर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत, पण हे आदेश देतानाच त्याला नवी मुंबईत प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. कोर्टाने म्हटले आहे की, गरज असेल तरच तपास अधिका-यांच्या परवानगीनेच निकाळजेला मुंबईत प्रवेश करता येणार आहे. पीडित तरुणी याच परिसरात राहत असल्याने ही बंदी घातली आहे. 

 

निकाळजेवर काय आहे आरोप ?
दीपक निकाळजेने लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप नवी मुंबईत राहणाऱ्या 22 वर्षीय युवतीने केला होता. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन नवी मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग केलं होतं. युवतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 2014 मध्ये ती कुर्ला येथे आपल्या मामाकडे आली असताना दीपक निकाळजेची तिच्यावर नजर पडली. तिच्या कुटुंबासोबत लगट करुन, तिला पैसे आणि लग्नाचं आमिष निकाळजेने दाखवलं. कर्जत येथील एका फार्म हाऊसवर आपल्या ऑडी कारमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. नंतर लग्नाची मागणी केली असता तिला धमकावण्यात आले. 


कोर्टात निकाळजेने काय दिले स्पष्टिकरण ?
हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत दीपक निकाळजेने म्हटले आहे की,  त्याचे तक्रारदाराशी 2014 पासून संबंध होते. या काळात काळात सदर तरुणी आपल्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. आपल्याशी लग्न न केल्यास या संबंधाची माहिती माझ्या पत्नीला देण्याची धमकीही ही तरुणी देत असे अशी कोर्टात सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...