आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलिकॉप्टरला अपघात झालाच नाही! मुख्यमंत्री कार्यालयाने दिले स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुरुवारी भाइंदर येथे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात होता होता वाचला, असे वृत्त आले. परंतु असा कोणताही अपघात झाला नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.


गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून भाइंदर येथे एका कार्यक्रमाला गेले. दुपारी सेव्हन इलेव्हन शाळेच्या प्रांगणात त्यांचे हेलिकॉप्टर उतरताना केबलची वायर मध्ये आल्याने पायलटने हेलिकॉप्टर पुन्हा वर नेले. हेलिकॉप्टर लँड झाले असते तर अपघात झाला असता. त्यामुळे मुख्यमंत्री अपघातातून बचावले, असे वृत्त आले. मात्र, हेलिकॉप्टर उतरवताना पायलटने केबलची वायर पाहिली. लँडिंगनंतर त्याने मुख्यमंत्र्यांना सांगितले की, परत जाताना ५-६ व्यक्तींचे वजन घेऊन टेक ऑफ करणे कठीण होईल. वायर आणि इमारती असल्याने फक्त दोन व्यक्तींना घेऊन हेलिकॉप्टर सरळ वर नेता येईल, तेव्हाच मुख्यमंत्र्यांसह सगळ्यांनी रस्ता मार्गे येण्याचे ठरवले. 

 

पुढे वाचा, लातूर, अलिबाग आणि नाशिकमधील हेलिकॉप्टर अपघात आणि इमर्जन्सी लँडिंगविषयी.. पाहा VIDEO..

बातम्या आणखी आहेत...