आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डावे नावापुरते उरलेत तर काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्या; देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  देशात 'डावे' फक्त नावाला उरले असल्याचा टोला यावेळी फडणवीसांनी लगावला आहे. काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पूर्वोत्तरच्या कार्यकर्त्यांचे फडणवीसांनी अभिनंदन केले. 'आम्ही गमतीने म्हणायचो, की पूर्वोत्तरात आमचा एक तरी उमेदवार निवडून येईल का? मात्र या तिन्ही राज्यात भाजपला 49 ते 50 टक्के मतदान असल्याने अभूतपूर्व विजय मिळाला. या राज्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी समाजाने भाजपवर प्रचंड विश्वास दाखवला आहे.' असे फडणवीस म्हणाले.

 


पूर्वीच्या केंद्र सरकारने या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. वन, खनिज संपत्ती आणि सीमा भाग असल्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची राज्ये आहेत. मोदींनी सर्वप्रथम अॅक्ट ईस्ट पॉलिसी तयार केली, त्यानुसार कामाला सुरुवात केली. एकात्मतेची भावना तयार करण्यात मोदींना यश आले. मोदींचा विकासाचा मंत्र आणि अमित शाह यांचे कुशल संघटन कौशल्य यामुळे कार्यकर्ते जोडले गेल्याचे फडणवीस म्हणाले.

 

 

एका पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावर मोदींवर टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे. हा ट्रेलर आहे, कर्नाटकात भाजपचे सरकार येणार आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमताने निवडून येणार, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विविध प्रकारचे भ्रम पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र जनता बॅलेटमधून उत्तर देत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

 


देशात डावे नावाला उरले आहेत. काल  लाल सूर्य मावळला आहे आणि केसरिया रंगाच्या सूर्याचा उदय झाला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पूर्वोत्तर राज्यांतील भाजपच्या विजयाचे हिरो सुनील देवधर यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. गेली दोन वर्ष सुनिल देवधर यांनी त्रिपुरात संघर्ष केला. माणिक सरकारचा बुरखा फाडला. त्यांच्याविरोधात पुस्तकाच्या रुपात चार्जशीट दाखल केले, असे म्हणत फडणवीसांनी देवधरांचे विशेष अभिनंदन केले.

 


पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...