आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीका- मित्र म्हणवणारेच पाठीमागे कटकारस्थान करतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालघर- कर्नाटकच्या राजकीय निकालानंतर आता राज्यातील लोकांचे लक्ष महाराष्ट्रातील लोकसभा पोटनिवडणुकांकडे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर जिल्ह्यातील कासा येथील प्रचार सभेत शिवसेनेवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याबाबत इतर बोलत असताना मित्र म्हणविणारे पाठीमागून कटकारस्थान करत होते. 

 

मुख्यमंत्री म्हणाले, मनांत काळबेरे असणाऱ्यांना वनगा यांच्याविषयी प्रेम नाही, या निवडणूकीत श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाल्यावर मातोश्रीवरील दरवाजे बंद होईल पण भाजपा दरवाजे खुले असतील, असेही फडवणीस यांनी सांगितले. पालघर येथे कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणूक शिवसेना उमेदवार विरोधात भाजपाने उमेदवार दिला नव्हता याचीही आठवण मुख्यमंत्र्यांनी करुन दिली. भाजपा विजयी म्हणजेच चिंतामन वनगा यांना खरी श्रद्धांजली असेल असे फडणवीस यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...