आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Monsoon Session: शेतक-यांच्‍या कर्जवाटपावर सरकारचे गांभीर्याने लक्ष- CM, 27 विधेयकांवर चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्‍य सरकार शेतकरी व सामान्‍यांच्‍या प्रश्‍नासंबंधी गंभीर असून मागील सरकारपेक्षा या सरकारने शेतक-यांना जास्‍त कर्जवाटप केले, असा दावा मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्‍या पुर्वसंध्‍येला आयोजित पत्रकार परिषदेत केला. तसेच या अधिवेशनात विधानभवनामध्‍ये 27 विधेयकांवर चर्चा करण्‍यात येईल, अशी माहितीही त्‍यांनी दिली. 

 

हेही वाचा...Monsoon Session: शिवसेनारूपी सावित्री ठामपणे उभी, त्यामुळे सरकार टिकून; विरोधकांची बोचरी टीका

 

आमच्‍या काळात जास्‍त कर्जवाटप 
पिक कर्ज वाटपावरुन विरोधकांनी राज्‍य सरकारवर टीका केली आहे. आतापर्यंत केवळ 7 ते 8 टक्‍के शेतक-यांना 6000 कोटी रुपयांचेच कर्जवाटप झाल्‍याचा दावा विरोधकांनी केला आहे. विरोधकांचा हा दावा खोडून काढत मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले की, या वर्षी 25 हजार कोटींपेक्षा जास्‍त कर्जवाटप झालेले आहे. एवढेच नव्‍हे तर मागील सरकारपेक्षा आम्‍ही जास्‍त कर्जवाटप केल्‍याचा दावाही मुख्‍यमंत्र्यांनी केला. मागील सरकारने शेतक-यांना केवळ 17 ते 18 हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. मात्र आमच्‍या शासनकाळात पहिल्‍या वर्षी 40 हजार कोटी, दुस-या वर्षी 46 हजार कोटी तर तिस-या वर्षी 25 हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्‍यात आले, असे मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले.


अजूनही कर्जमाफीची योजना बंद झालेली नाही 
काही शेतक-यांचे कर्जमाफीच्‍या यादीत नावच आले नाही, यावर उत्‍तर देताना मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले की, अजुनही कर्जमाफीची योजना बंद झालेली नाही. पुढील महिन्‍यापर्यंत कर्जवाटप करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे आणखी काही शेतक-यांना याचा फायदा घेता येईल. 

 

घोषणांचा पाऊस पाहायला मिळेल- वि.खे. पाटील 
या अधिवेशनात आपल्‍याला घोषणांचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र वास्‍तवात सरकारला शेतक-यांच्‍या व सामान्‍यांच्‍या प्रश्‍नांचे आव्‍हान पेलता आले नाही. त्‍यांच्‍या सर्व योजना फिसकटल्‍या, अशी टीका विरोधी पक्षनेते वि.खे. पाटील यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत केली.  
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...