आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रोलची शिकार ठरली CM पत्नी अमृता फडणवीस, हिंदुत्वावरून असा पाजला डोस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृता फडणवीस यांनी एका एफएम चॅनेलच्या चॅरिटी शोच्या ख्रिसमस थिम प्रमोशनला हजेरी लावल्यानंतर ट्रोल होत आहे. - Divya Marathi
अमृता फडणवीस यांनी एका एफएम चॅनेलच्या चॅरिटी शोच्या ख्रिसमस थिम प्रमोशनला हजेरी लावल्यानंतर ट्रोल होत आहे.

मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस ‘बी-सांता कॅंम्पेन’ चे समर्थन केल्याने ट्विटरवर ट्रोल होत आहे. ख्रिसमसचे समर्थन ट्रोल करणा-यांना पसंत पडलेले नाही. मात्र, अमृता यांनी ट्रोल करणा-या चोख उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे. अमृता यांनी म्हटले आहे की, "प्रेम, दान आणि  सद्भावनेला कोणताही धर्म नसतो. सर्व सकारात्मक स्वीकारु आणि नकारात्मक विचार, नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहू". ट्रोलर असा निशाणा साधताहेत अमृतावर....

 

- मंगळवारी अमृताने एक ट्विट केले होते, ज्यात त्यांनी एका कार्यक्रमातील फोटो शेयर केला होता. हा कार्यक्रम सांता थीम वर आधारित होती, जो एका एफएम चॅनेलने आयोजित केला होता.
- कार्यक्रमादरम्यानच्या फोटोसह अमृताने जेव्हा ट्विट केले की, 'बी-सांता कॅंम्पेन' ला जेव्हा लाँच केले तेव्हा अनेक लोकांनी ना केले. 
- सोशल मीडियात अमृतावर ख्रिश्चन धर्माला प्रमोट करणे, ख्रिश्चन धर्माकडे हिंदूंना आकर्षित करणे आणि ख्रिश्चन मिशनरींकडून एका अजेंड्यानुसार प्रमोट करण्याचे आरोप लावण्यात आले. अनेक लोकांनी अमृतावर संस्कृतीचा -हास करत असल्याचा आरोप सुद्धा केला. 
- अमृताला ट्रोलर्सने विचारले की, फटाक्याशिवाय दिवाळी साजरी करण्यास तुम्ही विरोध का केला नाही? आणि हिंदू सण-उत्सवादरम्यान असे काही गरिबांसाठी का केले नाही.

 

चोख प्रत्त्युत्तर आणि टि्वटची मालिकाच-

 

- ट्रोल करणा-यांना चोख प्रत्त्युत्तर देताना अमृता म्हणाल्या, मी हिंदू आहे, त्याचा मला इतरांप्रमाणे अभिमानही आहे. मी माझ्या देशात प्रत्येक सण साजरा करते. तसं प्रत्येक सण साजरा करावा की नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही आमच्या देशाच्या खऱ्याखुऱ्या प्रेम भावनेचं प्रतिनिधित्व करतो. यामुळे देश, धर्म आणि मानवतेला बाधा येत नाही.
- अमृताच्या कृतीला विरोध करणा-या शेफाली वैद्य म्हणाल्या, पती देवेंद्र फडणवीस ख्रिसमस प्रार्थना करतात, पत्नी बी सँटा अभियान सुरु करते. असो!  महाराष्ट्रात ख्रिश्चन धर्मप्रसार सोपा आहे. 
- आणखी एका टि्वटमध्ये त्या म्हणतात, प्रिय अमृता फडणवीस, तुमच्या सोशल मीडिया टीमला तुमच्या ट्विटखालील रिप्लाय वाचण्यास सांगा.  चिकन सूप फॉर द इव्हँजेलिकल सोल'च्या लेखकाप्रमाणे न वागता, तुमच्या पतीला निवडून दिलेल्या जनतेचा आदर करा.
- खासगी आयुष्यात तुम्ही व्यक्तिगतरित्या काहीही करु शकता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणजेच महाराष्ट्राची पहिली महिला म्हणून, तुमच्या प्रत्येक कृतीवर लोकांचं लक्ष असणारच, त्यावर मतप्रदर्शन, टीका होणारच. मात्र तुम्ही वर म्हटल्याप्रणाणे, 'आम्ही' म्हणजे तुम्हाला नेमकं कोण म्हणायचं आहे?
-  शेफाली वैद्य यांनी अमृता फडणवीस यांना गुजरातमधील एका चर्चच्या धर्मगुरुच्या वक्तव्याची आठवण करुन दिली. गुजरातमध्ये भाजपसारख्या 'राष्ट्रवादी' पक्षाला मतदान करु नका, असं ते म्हणाले होते, याची तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्या या वक्तव्याचा तुम्हाला अभिमान आहे का.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंंबंधित माहिती व फोटोज...

बातम्या आणखी आहेत...