आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटकोपर Crash : याच कंपनीच्या हेलिकॉप्टरमधून थोडक्यात बचावले होते CM फडणवीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - घाटकोपर दुर्घटनेनंतर विमान दुर्घटनांशी संबंधित अशी विविध माहिती समोर येत आहे. त्यातच समोर येणारी आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे घाटकोपरमध्ये ज्या कंपनीचे विमान क्रॅश झाले त्याच कंपनीच्या हेलिकॉप्टरमधून काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोडक्याच बचावले होते.  

 

अलिबागमध्ये हेलिकॉप्टरमध्ये प्रवेश करत असतानाच मुख्यमंत्र्यांबरोबर हा अपघात घडला होता. अलिबागमधून एका कार्यक्रमाहून परतताना मुख्यमंत्री जेव्हा हेलिकॉप्टरमध्ये बसत होते, तेव्हा मुख्यमंत्री बसण्याआधीच हेलिकॉप्टरच्या पायलटने टेकऑफ करण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्र्यांना नेमके काय होते हे समजण्याआधीच ते मागे फिरले होते. यू वाय एव्हीएशन कंपनीचेच हे हेलिकॉप्टर होते. या कंपनीचे विमान आज घाटकोपरमध्ये क्रॅश झाले. घाटकोपरमध्ये गुरुवारी झालेल्या विमान अपघातामध्ये पायलटसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 


नेमके काय घडले होते...
अलिबागहून मुंबईकडे निघालेले मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी पाऊल ठेवणार तेवढ्यात हेलिकॉप्टर लँडिंग मार्कच्या पुढे सरकल्यामुळे मागील पाते मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला लागण्याचा धोका उद्भवला होता. मात्र सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने त्यांना सुरक्षितस्थळी नेल्याने बाका प्रसंग टळला.


शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी अलिबाग येथे होते. दुपारी कार्यक्रम संपल्यानंतर सव्वाच्या सुमारास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह ते मुंबईला परतण्यासाठी निघाले. दुपारी १.५५ वाजता मुख्यमंत्री आणि तावडे हेलिपॅडजवळ पोहोचले तेव्हा हेलिकॉप्टर सुरू झाले होते. यादरम्यान मुख्यमंत्री दरवाजाला धरून चढणार तोच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेतला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवले. या वेळी थोडी तत्परता दाखवली नसती तर हेलिकॉप्टरचा मागील पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागला असता.

 

बातम्या आणखी आहेत...