आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससीच्या आंदोलनाला खासगी क्लासेसवाल्यांची फूस : मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींचे आंदोलन हे खासगी क्लासेसवाल्यांनी भडकवलेले आंदोलन आहे. आंदोलकांना त्यांचीच फूस असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला. मात्र, राज्य लोकसेवा आयोगाची भरती सुरू करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावरील चर्चेदरम्यान खुलासा करताना ते बोलत होते.   


विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी  एमपीएससी परीक्षार्थींच्या आंदोलनाचा विषय उपस्थित केला होता. लोकसेवा आयोगामार्फत पदांची भरती होत नसल्याने बेरोजगारात प्रचंड असंतोष असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो तरुणांचा मोर्चा मुंबईला आला असल्याचे ते म्हणाले. राज्यात सुमारे दीड लाख पदे रिक्त असताना आयोगामार्फत फक्त ६९ पदांची जाहिरात देण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले.

 

एकीकडे वर्षाला २ कोटी रोजगार निर्मितीची घोषणा सरकारतर्फे केली जाते, तर दुसरीकडे शासकीय नोकरभरतीत ३० टक्के कपात करण्याचेही प्रस्तावित केले जाते, ही विसंगती विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. एमपीएससीत काही गैरव्यवहार होत असतील तर ते दूर केले पाहिजेत. परंतु, त्यासाठी अनेक वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय करणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.  

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, शाळांची वीज बिलांची रक्कम आता थेट वीज खात्याकडे : शिक्षणमंत्री  

 

 

बातम्या आणखी आहेत...