आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंपेक्षा मी जास्त संस्कारी व सभ्य- UP CM योगी आदित्यनाथ यांचा पलटवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर प्रत्त्युत्तर दिले आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त संस्कारी व सभ्य ग्रहस्थ आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत मला काही शिकविण्याची गरज नाही.

 

योगी आदित्यनाथ चार दिवसापूर्वी (23 मे) राज्यातील पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी   नालासोपारा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना व उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करताना, वनगा यांना भाजपमधून फोडून विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेब असते तर असे घडले नसते, असेही योगी यांनी म्हटले होते.

 

यानंतर उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना चांगलेच लक्ष्य केले होते. ज्यांना शिवरायांना हार घालण्याआधी पायातल्या चपला काढता येत नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

 

योगी आदित्यनाथांसारखे लोक महाराष्ट्रात येऊन प्रवचने झोडतात. मरगट्टय़ांना ‘छत्रपती’ काय ते शिकवतात व पायात खडावारूपी चपला घालून शिवरायांना पुष्पमाला चढवतात. यावर भाजपचे काय म्हणणे आहे? शिवरायांचा हा अपमान पाहून थडग्यातला अफझलखानही आनंदाने नाचत असेल, अशा शब्दांत योगींवर हल्ला केला होता. यानंतर योगींनी उद्धव यांच्यापेक्षा मी जास्त संस्कारी व सभ्य ग्रहस्थ असल्याचे म्हटले आहे.   

बातम्या आणखी आहेत...