आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणक परिचालकांना यापुढे दर 15 तारखेला मानधन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील सुमारे २२ हजार संगणक परिचालकांना यापुढे महिन्याच्या १५ तारखेपर्यंत मानधन मिळेल, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. रविवारी मध्यरात्री वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी परिचालक संघटनेचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने सोमवारी काढण्यात येणारा भायखळा ते विधान भवन मोर्चा रद्द केला. मात्र, मोर्चासाठी आलेल्या उपस्थित परिचालकांनी आझाद मैदानात धरणे धरून आंदोलन मागे घेतले. 


गेल्या आठ महिन्यापासून मानधन मिळत नसल्यामुळे संगणक परिचालक संघटनेने मुंबई येथे विधानभावनांवर सोमवारी मोर्चाचे आयोजन केले होते. त्याची दखल घेऊन मोर्चाच्या एक दिवस पूर्वी चार मार्च रोजी मध्यरात्री मुख्यमंत्री फडणवीस व पंकजा मुंडे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळांसोबत बैठक घेतली. संगणक परिचालकांना सध्या विलंबाने मिळणारे मानधन प्रत्येक महिन्याच्या १५ तारेखेपर्यंत मिळण्यासाठी शासनाने नियोजन केल्याचे त्यांनी संघटनेला आश्वास्त केले.  या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, ग्रामविकास सचिव असीम गुप्ता उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...