आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत काँग्रेस पक्ष संविधान बचाव रॅली काढणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दिली.
चव्हाण म्हणाले, देश आणि राज्यातील सत्ताधारी संविधान बदलण्याच्या प्रयत्नात अाहेत. याविरोधात २६ जानेवारी रोजी सर्वपक्षीय संविधान बचाव रॅलीमध्ये काँग्रेस पक्षसुद्धा सहभागी होणार अाहे. तसेच त्याच दिवशी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी स्वतंत्रपणे संविधान बचाव रॅली काढण्यात येणार आहे.
सर्वपक्षीय संविधान बचाव रॅलीला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. राष्ट्रध्वज तीन रंगांचा असणे अशुभ असल्याचे भाजपची पितृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापूर्वी अनेकदा म्हटलेले आहे. नागपूरच्या संघ मुख्यालयात अनेक वर्षे तिरंगा फडकवलाच जात नव्हता. तेच लोक तिरंगा रॅली काढताहेत हे हास्यापद असल्याचे चव्हाण या वेळी म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे आदी नेतेमंडळी उपस्थित होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.