आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेहिशेबी मालमत्ता: काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांचे कुटुंबीयही आरोपमुक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - माजी गृह राज्यमंत्री व काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांच्याप्रमाणेच त्यांच्या कुटुंबीयांनाही बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या  आरोपातून न्यायालयाने मुक्त केले. मंगळवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डी. के. गुडधे यांनी हा निर्णय दिला. 
 कृपाशंकर सिंह यांच्याविराेधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. त्यानुसार २०१२ मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची एसीबी, ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) यांनी चाैकशी केली हाेती.

 

ईओडब्ल्यूने कोर्टात आरोपपत्रही दाखल केले होते.   कारवाईच्या वेळी कृपाशंकर हे अामदार हाेते, मात्र त्यांच्यावर कारवाईसाठी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष यांची परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच आरोपपत्रात अनेक विसंगती असल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने सिंह यांना फेब्रुवारी २०१८ सर्व आरोपांतून मुक्त केले होते. अाराेपपत्रात कृपाशंकर क्रमांक एकचे आरोपी होते, तर कुटुंबातील सदस्य सहआरोपी होते. मात्र, मुख्य आरोपीचीच निर्दोष मुक्तता झाल्याने, त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा निर्दोषत्वाचा मार्ग मोकळा झाला होता.

 

त्यानुसार न्यायालयाने कृपाशंकर यांची पत्नी (मालतीदेवी), मुलगा (नरेंद्र मोहन), मुलगी (सुनीता) जावई (विजय सिंह) यांची निर्दोष मुक्तता केली.

बातम्या आणखी आहेत...