आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही ७० वर्षे लोकशाही टिकवली म्हणून चहावाला पंतप्रधान: मल्लिकार्जुन खरगे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या ७० वर्षांत आम्ही काय केले असे पंतप्रधान मोदी विचारतात. आम्ही काही केले नसते तर मोदी आज त्या खुर्चीवर बसले असते का? आम्ही लोकशाही टिकवली म्हणून एक चहावाला पंतप्रधान झाला, या शब्दात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. 


महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी झाल्यानंतर प्रथमच ते मुंबई दौऱ्यावर आले आहेत. रविवारी सकाळी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात ते म्हणाले, पंतप्रधान मोदी फक्त मोठमोठ्या घोषणा करतायत, पण सत्य परिस्थितीत तसे काहीच नसते. पंतप्रधान काँग्रेसला "बेल'गाडी म्हणतात, पण बुलेट ट्रेनमधून सर्वात जास्त अपराधी ते घेऊन येणार आहेत. बुलेट ट्रेन यायला हवी पण आधी ट्रॅक तर सुधारले पाहिजे. रोज एक पूल कोसळतोय, त्यात आधी सुधारणा तर करा. गोरक्षेच्या नावावर लोकांना मारण्यात आले. काँग्रेसमध्ये हिंदू नाहीत का? फक्त भाजपमध्येच हिंदू आहेत का? असा प्रश्न करीत राजकारणात सत्ता येते जाते पण विचारधारा टिकली पाहिजे. मतभेद विसरून एकत्र या आणि काँग्रेसची सत्ता आणा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

बातम्या आणखी आहेत...